मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील (South Film industry) सुपरस्टार अल्लु अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा-२’ (Pushpa 2) या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. पुष्पाच्या या सिनेमातील लूकपासून ते टीझरपर्यंत सगळ्याच गोष्टी लक्षवेधी ठरल्या आहेत. पुष्पाचा पहिला भाग आणि त्यातील गाणी प्रचंड गाजली होती. यातील ‘ऊ अंटावा’ या आयटम साँगलाही प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या गाण्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) झळकली होती. मात्र, पुष्पाच्या दुसर्या भागातही आयटम साँग (Item Song) असणार आहे. पण यावेळी समंथा नव्हे तर दुसरीच अभिनेत्री थिरकताना दिसणार आहे.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अॅनिमल या सिनेमामुळे रातोरात प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) असणार असल्याची चर्चा आहे. पुष्पा-२ या चित्रपटाच्या आयटम साँगमध्ये तृप्तीला पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. पण चित्रपटाच्या मेकर्सनं अजून याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
तृप्तीला अॅनिमल या चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील रणबीर कपूर आणि तृप्तीच्या केमिस्ट्रीने अनेकांचे लक्ष वेधले. याआधी तिने पोस्टर बॉईज आणि कला या चित्रपटांत देखील काम केले होते. ती आगामी भुलभुलैया ३ मध्ये आदित्य रॉय कपूरसोबतही मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
पुष्पा-२ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटातील पुष्पा-पुष्पा हे पहिले गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. त्यानंतर आता ‘अंगारों (द कपल साँग) हे गाणं २९ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक पुष्पा-२ या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…