मुंबई: मध आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मधामध्ये व्हिटामिन, मिनरल्स आणि अँटीव्हायरल गुण आढळतात.
उन्हाळ्यात मध खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे मिळतात. उन्हाळ्यात मध खाल्ल्याने उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.
मधामुळे शरीराला एखाद्या संक्रमणापासून लढण्यास मदत मिळते. मधामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.
मध एक नैसर्गिक स्वीटनर असते. मधामुळे तुम्ही गोड खाण्याचे क्रेव्हिंग कमी करू शकता. गोड खाण्याची तीव्र इच्छा झाल्यास मध खा. मधामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात.