Sanjay Raut : पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल!

Share

ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांना ‘ते’ वक्तव्य चांगलंच भोवणार

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आपल्या चुकीच्या वक्तव्यांनी कायम स्वतःला अडचणीत टाकत असतात. त्यामुळे ठाकरे गटाचं (Thackeray Group) मोठं नुकसान होतं. त्यातच आता लोकसभा निवडणुका (Loksabha Election) मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात असताना संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर पातळी सोडून टीका केल्यामुळे व त्यांची तुलना औरंगजेबाशी (Aurangzeb) केल्यामुळे संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी अहमदनगरच्या (Ahmednagar) कोतवाली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल काजळे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा निवडणूक शाखेकडून राऊत यांच्यावर कारवाईबाबत कोतवाली पोलिसांना प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने राऊत यांच्या विरोधात भादंवि कलम १७१(क), ५०६ आणि लोकप्रतिनिधी अधिनियम १२३ (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

नगर-दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी संजय राऊत यांनी ८ मे रोजी अहमदनगर शहरातील क्लेराब्रूस मैदानावर सायंकाळी प्रचारसभा घेतली होती. या सभेत त्यांनी औरंगजेबाच्या जन्मस्थळाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यांनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेखही केला. त्यामुळे वाद उसळला आणि राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

काय म्हणाले होते संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले होते की, “आपल्याला इतिहासामध्ये जावं लागेल. औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला होता, तेथील माती औरंगजेबाची माती आहे. त्या मातीतील हे दोन व्यापारी आहेत. औरंगजेबाचा जन्म आणि नरेंद्र मोदी यांचा जन्म दावत मध्ये झाला आहे. औरंगजेब तिथे जन्माला आला आहे. त्यामुळे आपल्याशी औरंगजेब्याच्या वृत्तीने हे दोन व्यापारी वागत आहेत. एका औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडला आहे. तर तू कोण?” अशा प्रकारे पंतप्रधानांविषयी एकेरी भाषेत वक्तव्य करणं संजय राऊतांना चांगलंच भोवणार आहे.

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

5 minutes ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

15 minutes ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

35 minutes ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

47 minutes ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

1 hour ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

2 hours ago