मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, दोन दिवसांनंतर अत्यंत शुभ राजयोगाची निर्मिती होणार आहे. १९ मे रोजी शुक्र ग्रहाचं संक्रमण असणारी रास म्हणजेच वृषभ राशीत (Taurus) प्रवेश करणार आहे. हा राजयोग ज्योतिष शास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो. या राजयोगामुळे ४ राशींच्या लोकांना लाभ मिळणार आहे. या लोकांच्या नोकरीत पदोन्नती होऊ शकते. तसेच, व्यवसायात बढती मिळू शकते. या राजयोगामुळे वृषभ राशीसह काही राशीतील लोकांच्या आयुष्यात सुगीचे दिवस येणार आहेत. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी.
मेष राशीच्या लोकांसाठी गजलक्ष्मी योग फारच शुभ परिणाम देणारा आहे. या राशीतील लोकांचा स्वभाव शांत असणार आहे. इतर लोक तुमच्या वागण्याने इम्प्रेस होऊ शकतात. तसेच, तुम्हाला धनलाभाचीही चांगली संधी मिळणार आहे. तुमचा व्यवहार सुरळीत चालेल. तसेच, बऱ्याच दिवसांपासून अडकलेले तुमचे पैसे देखील तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गासाठी हा काळ चांगला आहे. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल.
वृषभ राशीत गुरु आणि शुक्र यांच्या युतीने गजलक्ष्मी राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे. या दरम्यान तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती पूर्ण होण्याची पुरेपूर शक्यता आहे. तसेच अविवाहितांसाठी हा काळ शुभ असणार आहे.
मकर राशीच्या लोकांना प्रत्येक कार्यात यश मिळणार आहे. तसेच, अनपेक्षित धनलाभही होऊ शकतो. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचं मार्गदर्शन मिळू शकतं. ज्यामुळे तुम्हाला खूप लाभ मिळेल.
गजलक्ष्मी राजयोगाने कुंभ राशीच्या लोकांनाही याचा लाभ मिळणार आहे. या राशीतील लोकांच्या जीवनात सुख-समृद्धीत, धन-संपत्तीत वाढ होईल. तसेच, मिळालेले पैसेही तुम्ही योग्य ठिकाणी खर्च कराल. या दरम्यान तुम्ही वाहन खरेदी करू शकता. तसेच, तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल.
(टीप- वरील सर्व माहिती ज्योतिषतज्ञांकडून दिलेली आहे. ‘प्रहार’ या गोष्टींची कोणतीही पुष्टी करत नाही.)
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…