मुंबई : नव्या शैक्षणिक वर्षात शिक्षण मंडळा कडून बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. अशातच आता मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक असणाऱ्या मुंबई विद्यापीठाने मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाकडून परिक्षांच्या गुणविभागणीत बदल केला जाणार असल्याची घोषणा विद्यापीठाने केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परिक्षांदरम्यान ६०-४० ही गुणपद्धती लागू करण्याचा येणार आहे. त्यामुळे येत्या काळात विद्यार्थ्यांना ६० गुणांची लेखी परीक्षा आणि अंतर्गत मुल्यमापनासाठी ४० गुण अशी विभागणी करण्यात येईल, असे विद्यापीठाने सांगितले.
मूल्यमापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्षातील उपस्थिती, प्रात्यक्षिकं, प्रोजेक्ट, टेस्ट आणि असाईन्मेंटचा समावेश असणार आहे. वर्षभर विद्यार्थ्यांचं या निकषांवर मूल्यमापन करण्यात येणार असून, त्या आधारे त्यांना ४० गुण देण्यात येतील. ज्यामुळे विद्यार्थ्यांना वर्षभरात महाविद्यालयात हजर राहणं बांधील असेल.
२०११-१२ मध्ये मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदा ६०-४० गुण विभागणीची पद्धत अवलंबात आणली होती. मात्र त्यामध्ये ४० गुणांसाठी घेतल्या जाणाऱ्या अंतर्गत मूल्यमापन पद्धतीमध्ये गैरप्रकार होत असल्याची काही प्रकरणं उघडकीस आली होती. त्यामुळे २०१६-१७ साली ही पद्धत विद्यापीठाने पूर्णपणे बंद केली होती.
दरम्यान, आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बीएससी, बीकॉम आणि बीए या अभ्यासक्रमांकरता ६०-४० गुणविभागणी पद्धत पुन्हा लागू करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील माहिती विद्यापीठाने एका परिपत्रकाच्या माध्यमातून दिली. या गुणविभागणीचा फायदा शैक्षणिक वर्षात होणार असून अंतर्गत मूल्यमापनाचे गुण गृहित धरले जाणार असणार असल्यामुळे विद्यार्थ्यांची वर्गात अधिक उपस्थिती असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अद्यापही काही महाविद्यालयांना या आदेशासंदर्भात स्पष्टोक्ती नसल्यामुळे जून महिन्याच्या अखेरपर्यंत चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…