मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आज तिसऱ्या टप्प्यात मतदान सुरु आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी (NCP) सर्वात चुरशीची लढत असलेल्या बारामती मतदारसंघातही (Baramati Loksabha) मतदान होत आहे. मात्र, त्यातच शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक लक्ष वेधून घेणारी कृती केली आहे. राष्ट्रवादीतील फुटीमुळे अजित पवार विरुद्ध शरद पवार (Ajit Pawar VS Sharad Pawar) असा संघर्ष टोकाला गेलेला असतानाच सुप्रिया सुळे या बारामतीतील मतदानाच्याच दिवशी थेट अजित पवारांच्या काटेवाडीतील निवासस्थानी जाऊन धडकल्या आहेत. या नव्या ट्विस्टमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
बारामतीत सध्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) असा लढा आहे. बारामतीत राष्ट्रवादीचा मतदार विभागला आहे. मात्र, त्यातच सुप्रिया सुळेंनी एक नवी खेळी खेळली आहे. मतदान केल्यानंतर त्या कोणालाही सोबत न घेता अजित पवारांच्या घरी दाखल झाल्या. या भेटीमागील कारण सुप्रिया सुळे यांनी सांगितले. आशाताई पवार म्हणजेच अजित पवारांच्या आईच्या भेटीसाठी त्या इथे दाखल झाल्याचं त्या म्हणाल्या. मात्र, केवळ काकींचा आशीर्वाद घेणं हेच एक कारण या भेटीमागे असू शकतं का यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या काटेवाडीमधील घरी जाऊन अजित पवारांच्या आई आशा पवार यांची भेट घेतली. यावेळी घरी अजित पवार आणि सुनेत्रा पवार नव्हत्या. काकींना भेटण्यासाठी आपण आलो होतो असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ‘आशा काकींना भेटायला आली होती, त्यांचा आशिर्वाद घ्यायला आली होती’, असं त्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलं.
बारामतीमध्ये मतदानासाठी अजून काही तासांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे जे आता मतदान करणार आहेत, त्यांच्यावर या भेटीचा काही परिणाम होणार का आणि मते फिरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निवडणुकीत प्रचाराच्या वेळी पवार वि. पवार अशी लढाई दाखवण्यात आली मात्र हे कुटुंब एकच आहे का? असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे लढाई होत असताना दोन्ही नेते कुटुंब म्हणून एक राहणार असतील, तर मतदार किंवा कार्यकर्ते नक्कीच विचार करतील.
श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…