मुंबई : अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार प्रकरणात (Firing case) मोठमोठे खुलासे होत आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांचा (Mumbai Police) वेगाने तापास सुरु असून आता पाचव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने मोहम्मद चौधरी (Mohammed Choudhary) नावाच्या आरोपीला राजस्थानवरुन (Rajsthan) अटक केली आहे. गोळीबार करणाऱ्यांना लॉजिस्टिक्स मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. गुन्हे शाखेचे पथक आरोपीला घेऊन मुंबईत आले आहेत.
मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने सांगितले की, आरोपी मोहम्मद चौधरीने सागर पाल आणि विक्की गुप्ता या दोघांनाही पैसे पुरवण्यात आणि रेकी करण्यात मदत केली. मोहम्मद चौधरीला आज मुंबईत आणण्यात आले असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. शिवाय कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.
सलमान खानच्या घराजवळ १४ एप्रिल रोजी गोळीबार करण्यात आला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत वेगाने हालचाली करत आरोपींना ताब्यात घेतले. दरम्यान, यातील एका आरोपीने अनुज थापनने (Anuj Thapan) १ मे रोजी तुरुंगात आत्महत्या केली. सध्या या प्रकरणाचा आणखी तपास सुरु आहे. मोहम्मद चौधरीकडून आणखी काय खुलासे होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…