Sairat Movie : मराठी सिनेमाला सातासमुद्रापार नेणाऱ्या ‘सैराट’ला आठ वर्षे पूर्ण!

Share

रिंकूने शेअर केले आर्ची-परशाचे अनसीन फोटोज

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत (Marathi cinema) दर्जेदार सिनेमांचा तुटवडा जाणवत असताना एक असा सिनेमा आला की ज्याने मराठी सिनेमांचं समीकरणच बदलून टाकलं. मराठी सिनेमाला सातासमुद्रापार नेणाऱ्या या सिनेमाने मराठीत आजवरची सर्वाधिक १०० कोटींची कमाई केली. तो म्हणजे नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘सैराट’ सिनेमा (Sairat Movie). या सिनेमाने नावाप्रमाणेच प्रेक्षकांना सैराट करुन सोडलं. आजही कोणत्याही कार्यक्रमात ‘झिंगाट’ (Zingaat) गाण्यावर नाचल्याशिवाय लोकांचं मन भरत नाही, ही या सिनेमाची आणि अजय-अतुलच्या (Ajay-Atul) संगीताची जादू आहे.

‘सैराट’ सिनेमाला आज आठ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने या चित्रपटाची नायिका रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) म्हणजेच सगळ्यांची लाडकी आर्ची हिने आर्ची-परशाचे (Archi-Parshya) काही अनसीन फोटोज शेअर केले आहेत. पडद्यामागील रिंकू-आकाशची धमाल, घोडेस्वारी करतानाचा फोटो आणि तिचं पहिलं फोटोशूट या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “सैराटला आज ८ वर्ष पूर्ण झाली…” असं कॅप्शन रिंकूने या फोटोंना दिलं आहे. हे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांनी रिंकूच्या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट करत सैराटचे तिचे गाजलेले संवाद पोस्ट केले आहेत. तर एकाने,”मराठी चित्रपट जगताला वरच्या टोकावर नेण्याचा आणि मराठीची ताकद जगाला दाखवण्याचा नागराज मंजुळेचा सर्वोत्तम प्रयत्न होता. अजय-अतुल यांनी आपल्या ज्ञानाने मराठी संगीत जगभर गाजवले. उमदा अभिनय परश्या आर्ची” असं म्हणत या सिनेमाचं कौतुक केलं तर एकाने सैराटचा दुसरा पार्ट काढण्याची मागणी केली आहे.

‘सैराट’ सिनेमा २९ एप्रिल २०१६ रोजी प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा पाहण्यासाठी लोक एक-दोनदा नव्हे तर तब्बल १७ वेळा सिनेमागृहात गेल्याचीही उदाहरणे आहेत. प्रेम, मैत्री आणि मजामस्ती दाखवत असतानाच एका महत्त्वाच्या सामाजिक विषयावर या चित्रपटाने भाष्य केलं होतं. समाजातील सत्य परिस्थिती दाखवण्यात नागराज मंजुळे यशस्वी झाला आणि म्हणूनच हा चित्रपट लोकांनाही प्रचंड आवडला. रिंकूने शेअर केलेल्या फोटोजच्या निमित्ताने आठ वर्षांपूर्वीचा रिंकूचा लूक आणि तिच्यात इतक्या वर्षांमध्ये झालेले बदल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ती आठवीत शिकत असताना तिने या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. तेव्हाचे रिंकू-आकाश आणि सिनेमाला यश मिळाल्यानंतर त्यांच्यात घडलेला बदल खरंच लक्ष वेधून घेणारा आहे.

Recent Posts

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

5 minutes ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

20 minutes ago

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

1 hour ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

2 hours ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

6 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

6 hours ago