मुंबई : उन्हाळ्याचे दिवस येताच अनेक जण आंब्यावर ताव मारतात. उन्हाळ्याचे तीन महिनेच हे फळ बाजारात मिळत असल्याकारणाने सगळेच लोक या दिवसात मिळेल तितका आंबा खाऊन घेतात. मात्र आंबा हा उष्ण पदार्थ असल्यामुळे तो खाल्ल्यावर अनेकांच्या आरोग्याबाबतीत तक्रारी येऊ लागतात. अशावेळी आंबा नव्हे तर कच्ची कैरी खाण्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे आहेत.
कच्ची कैरी खाणे अनेकांना आवडते. पण ती आंबट असल्याने दात आंबतात, खोकला लागतो असे अनेकांना होते. त्यामुळे कच्ची कैरी खायला अनेकजण टाळतात. मात्र कैरी खाण्याचे फायदे आणि खाण्याची योग्य पद्धत असली तर त्याचे आरोग्याला काहीही साईड इफेक्ट होत नाही. जाणून घ्या कैरी खाण्याचे फायदे नक्की काय आहेत वर ती कशा प्रकारे खावी.
कैरीमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) असते. व्हिटॅमिन सीमुळे इम्युनिटी वाढते. त्यामुळे तुम्हाला जर शरीरातील इम्युनिटी वाढवायची असेल तर तुम्ही कैरी खाऊ शकता. कैरीमध्ये कॅरोटीनॉईड मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.
कैरीमध्ये व्हिटॅमिन बी (Vitamin B) आणि फायबर (Fiber) असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन (Blood Circulatory System) योग्य पद्धतीने होते. परिणामी हृदयविकाराचा धोका कमी होतो.
कैरी खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते. अपचन किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या जाणवत असतील तर तुम्ही कैरी खाऊ शकता. तसेच प्रेग्नन्सी मॉर्निंग सीकनेस आणि मळमळ जाणवत असेल, तरी देखील महिला कैरी खाऊ शकतात. कैरीमध्ये आढळणारे झेक्सॅन्थिन हे अँटीऑक्सिडंट डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. हे डोळ्यांचे मॅक्युलर डिजनरेशनपासून संरक्षण करते.
जर तुम्हाला कच्ची कैरी खाणं आवडत नसेल तर तुम्ही कैरीचे पन्ह, डाळ कैरी, कैरीची चटणी अशा पद्धतीने कैरीचा आहारात समावेश करु शकता. ज्यामुळे दात आंबणे आणि खोकल्याचा त्रास उद्भवणार नाही.
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…