मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘पुष्पा २: द रुल’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाबाबत नवनवीन अपडेट समोर येत आहेत. ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता चित्रपटातील पहिल्या गाण्याचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित झाला आहे.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पुष्पा-२ या चित्रपटामधील ‘पुष्पा पुष्पा’ या पहिल्या गाण्याचा प्रोमो रिलीज केला आहे. देवी श्री प्रसाद उर्फ रॉकस्टार डीएसपी यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे पुष्पाची उत्सुकता आणखी वाढवत आहे. ‘पुष्पा: द राईज’ चित्रपटाचे संगीत जगभर लोकप्रिय झाल्या नंतर आता ‘पुष्पा पुष्पा’ या गाण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
अल्लू अर्जुनने गाण्याचा प्रोमो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. “‘पुष्पा पुष्पा’ १ मेला सकाळी ११.०७ वाजता भेटीस येत आहे”, असं कॅप्शन लिहित अल्लू अर्जुनने गाण्याचा प्रोमो शेअर केला आहे. प्रेक्षकांनी या बद्दल उत्सुकता व्यक्त करत या बद्दल भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…