मुंबई : नाविन्यपूर्ण इलेक्ट्रिक वाहनं आणि इलॉन मस्क यांच्यामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या टेस्लाने मोठी कर्मचारी कपात जाहीर केली आहे. टेस्ला शेअर्सच्या किंमतीत घसरण होत असल्यामुळे टेस्ला या जगातील आघाडीच्या इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनीने जगातील त्यांच्या एकूण मनुष्यबळातून १० टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड मारली आहे. त्याचबरोबर टेस्लाची वाढ आणि कंपनीच्या आगामी काळातील वाटचाली विषयीदेखील चर्चा होते आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार एका मेमोमध्ये टेस्लाचे सर्वेसर्वा आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या इलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना म्हटलं आहे की ”कर्मचारी कपातीचा त्यांना सर्वाधिक तिरस्कार वाटतो. मात्र असे केल्याशिवाय पर्याय नव्हता, हे करावंच लागणार होतं. तसेच पुढे आम्ही कंपनीचा सखोल आढावा घेतला आहे आणि जगभरातील मनुष्यबळ १० टक्क्यांनी कमी करण्याचा कठीण निर्णय आम्ही घेतला आहे’ असे इलॉन मस्क यांनी सांगितले.
रनिंग पॉईंट कॅपिटल अॅडव्हायझर्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी असलेल्या मायकल अॅशले स्कलमन यांनी म्हटलं आहे की, नोकर कपातीपेक्षाही टेस्लासमोर गंभीर आव्हानं आहेत ही बाब अधिक नकारात्मक आहे.
मात्र विश्लेषकांच्या मते, टेस्लाने कारचे नवीन मॉडेल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) गुंतवणूक केल्यामुळे कंपनीला खर्च कपात करण्याचा दबाव आला आहे. इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी असलेल्या टेस्लाच्या जुन्या मॉडेलमध्ये बदल करण्याचा वेग मंदावला होता. व्याजदरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांना महागड्या गाड्या घेणे शक्य होत नव्हते. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत घट होत असल्याचे टेस्लाने सांगितले. तसेच कंपनीचा ताजा तिमाही अहवाल या महिन्याअखेरीस सादर करण्यात येईल असे टेस्लाने म्हटले आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…