मुंबई: चेन्नई आणि मुंबई यांच्यात रविवारी रंगलेल्या सामन्यात चेन्नईने बाजी मारली. चेन्नईने मुंबईला विजयासाठी २०७ धावांचे आव्हान दिले होते. मात्र हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सला २० षटकांत केवळ ८ बाद १८६ धावाच करता आल्या. या पद्धतीने ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने हा सामना २० धावांनी आपल्या नावावर केला.
दरम्यान, मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली. रोहितने ६३ बॉलमध्ये १०५ धावांची खेळी केली. यावेळी त्याने ११ चौकार आणि ५ षटकार ठोकले. मात्र त्याचे हे शतक मुंबईचा पराभव टाळू शकले नाही.
खरंतर, रोहित शर्माला इतर फलंदाजांची साजेशी साथ मिळू शकली नाही. रोहित शर्माने एक बाजू लावून धरली. मात्र दुसऱ्या बाजूने नियमित अंतराने फलंदाज बाद होत होते. तिलक वर्माने २० बॉलमध्ये ३१ धावांची खेळी केली. तर इशान किशनने १५ बॉलमध्ये २३ धावा केल्या. सूर्यकुमार यादव कोणतीही धाव न घेता बाद झाला. याशिवाय टीम डेविड आणि रोमरिया शेफर्ड या फलंदाजांनी निरााशा केली.
आता चेन्नई सुपर किंग्सचे ६ सामन्यातून ८ पॉईंट्स झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्सचे ६ सामन्यांत ४ पॉईंटस झालेत ते आठव्या स्थानावर आहेत. या सामन्याआधी हार्दिकचा संघ सातव्या स्थानावर होता.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…