Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीगौण खनिज उत्पन्नातून कोकण विभागाची विक्रमी वसुली

गौण खनिज उत्पन्नातून कोकण विभागाची विक्रमी वसुली

गत आर्थिक वर्षात १ हजार ११५ कोटींचे उत्पन्न

नवी मुंबई(मच्छिंद्र पाटील) : कोकण विभागात सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात गौण खनिज उत्खनन नियमापासून तब्बल १ हजार ११५ कोटी इतकी विक्रमी रक्कम वसूल करण्यात महसूल विभागास यश आले आहे. गौण खनिज उत्खनन नियमापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी कोकण विभागाला देण्यात आलेल्या उद्दीष्टाच्या १३५.८८ टक्के वसूली करण्यात आली असल्याची माहिती कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.

शासन स्तरावरुन कोकण विभागासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता गौण खनिज उत्खनन नियमापासून ८२० कोटी रुपये उत्पन्न वसूलीचे उद्दिष्ट निश्चित करुन देण्यात आले होते. सदर उद्दिष्ट १०० टक्के साध्य करण्यासाठी सर्व यंत्रणांनी गौण खनिज उत्खनन नियमांचे काटेकोर पालन करुन त्यासाठी विशेष नियोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या होत्या.

त्यानुसार कोकण विभागाने कालबद्ध नियोजन करुन ३१ मार्च, २०२४ अखेरपर्यंत एकूण १ हजार ११५ कोटी उत्पन्नाची वसूली साध्य केली. कोकण विभागाच्या या यशस्वी कामगिरीबद्दल विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सर्व यंत्रणांचे अभिनंदन केले आहे.

जिल्हानिहाय उत्पन्न वसुलीची माहिती पुढीलप्रमाणे : मुंबई शहर ५३ कोटी रुपये , मुंबई उपनगर १८० कोटी, ठाणे २८८ कोटी २४ लाख, पालघर १६३ कोटी ७५ लाख, रायगड २८० कोटी ४२ लाख , रत्नागिरी ८४ कोटी ६६ लाख आणि सिंधुदूर्ग ५४ कोटी ७५ लाख इतकी वसूली करुन कोकण विभागाने गौण खनिज उत्पन्न वसूलीकरिता शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजेच १३५.८८ टक्के उत्पन्न साध्य केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -