मुंबई : चैत्र पाडव्याला आपण घरोघरी गुढी उभारुन मराठी नववर्षाला मोठ्या उत्साहात सुरुवात करतो. यावेळी पुरणपोळीचा बेत आखला जातो. त्यासोबतच कडुलिंबाच्या पानाचाही नैवेद्य दाखवला जातो. कडुलिंबाची पाने आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी त्याचे सेवन केले जाते. मात्र सायंकाळी गुढी उतरवल्यानंतर कडुलिंबाचा पाला फेकून न देता त्याचा ‘असा’ वापर तुम्ही करु शकता. (Neem Leaves Uses)
‘वर्षाची सुरुवात कडू झाली तरीही शेवट मात्र गोड व्हावा’ या संदेशामार्फत गुढीपाडव्याच्या नैवेद्यातून कडुलिंबाची कोवळी पाने, गूळ, साखर, जिरे, मिरे, हरभऱ्याची डाळ, ओवा, हिंग, धने, मीठ यांचे मिश्रण करुन प्रत्येकाला प्रसाद म्हणून खायला देतात. यामुळे शरीर तेजस्वी व निरोगी बनते तसेच दुर्धर व्याधी दूर होतात.
कडुलिंबाची पाने आरोग्यासाठी उपयुक्त असतात, आजार कित्येक मात्र उपाय एक म्हणून कडुलिंबांच्या पानांचा वापर केला जातो. शरीरासाठी गुणकारक असणाऱ्या कडुलिंबाच्या पानांचा प्रसादही बनवला जाऊ शकतो. हरभरा डाळ ४-५ तास स्वच्छ पाण्यात भिजत ठेवावी. नंतर कडुलिंबाचा पाला स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यात हरभरा डाळ, कडुलिंबाची पाने, जिरे, ओवा, वाळलेलं खोबरे, गुळ किंवा साखर आणि चिंच एकत्र करुन बारीक करुन घ्यावे. मिश्रण तयार झाल्यानंतर आवडीनुसार मध घालून कडुलिंबाच्या पानांचा प्रसाद तयार होतो.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…