बंगळुरु : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोतील (ISRO) शास्त्रज्ञ आपल्या अपार बुद्धिमत्तेच्या जोरावर उंचच उंच भरारी घेत आहेत. अत्यंत कमी खर्चात त्यांनी ‘चांद्रयान-३’ मोहिम (Chandrayaan-3 Mission) यशस्वी करुन दाखवली. त्यानंतर आता पुन्हा एक मोठं यश इस्रोने आपल्या नावावर केलं आहे. इस्रोच्या पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहन टेक्नॉलॉजीची (Reusable Launch Vehicle Technology) चाचणी यशस्वी झाली आहे. या वाहनाचे नाव पुष्पक (Pushpak) असे आहे. यामुळे पुढील अंतराळ मोहिमा कमी खर्चात करण्यास मदत होणार आहे.
इस्रोचे पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन पुष्पक आज सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल चाचणी दरम्यान यशस्वीरित्या धावपट्टीवर उतरले. RLV LX-02 लँडिंग प्रयोग सुरू केल्याने, पुन्हा वापरण्यायोग्य लॉन्च व्हेईकल (RLV) टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात एक मोठा टप्पा गाठला गेला आहे.
इस्रोने यापूर्वीही दोन वेळा पुन्हा वापरता येण्याजोगे (रियूजेबल) प्रक्षेपण वाहन यशस्वीरित्या लँड केलं आहे. गेल्या वर्षी, इस्रोने पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनाच्या टेस्टिंग दरम्यान, RLV हे हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरमधून सुमारे साडेचार किलोमीटर उंचीवरून प्रक्षेपित करण्यात आलं होतं. चाचणी दरम्यान, RLV धावपट्टीवर यशस्वीरित्या उतरले. RLV ने ब्रेक पॅराशूट, लँडिंग गियर ब्रेक आणि नोज व्हील स्टीयरिंग सिस्टमच्या मदतीने यशस्वी लँडिंग केले. पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनाच्या यशस्वी लँडिंगने नेव्हिगेशन, कंट्रोल सिस्टम, लँडिंग गियर आणि डिलेरेशन सिस्टम यांसारख्या इस्रोने विकसित केलेल्या टेक्नॉलॉजीच्या यशाचा पुन्हा एकदा उल्लेख केला आहे.
या संदर्भात इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ म्हणाले की, भारतात पुष्पक प्रक्षेपण वाहन बनवणे हे भारताच्या अंतराळ मोहिमेला किफायतशीर बनवण्यासाठी एक मोठं आणि आव्हानात्मक पाऊल होतं. मात्र, पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन बनून, हे वाहन मोहिमेच्या यशानंतर पृथ्वीवर परत सुरक्षितपणे उतरण्यास सक्षम असेल तसेच देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल असणार आहे असंही ते म्हणाले.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…