मुंबई : काँग्रेसच्या (Congress) भारत जोडो न्याय यात्रेची (Bharat Jodo Nyay Yatra) आज मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park, Dadar) सांगता होणार आहे. त्यासाठी मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला राहुल गांधींसह (Rahul Gandhi), प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) तसेच उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी शिवाजी पार्कमधील सभेवरुन उद्धव ठाकरेंना टोले लगावले आहेत. तसेच ‘आज शिवाजी पार्कवर पाच गोष्टी ऐकू येणार नाहीत’ असं म्हणत राहुल गांधींवरही अप्रत्यक्ष टीका केली आहे.
मिलिंद देवरा यांनी सोशल मीडियावर एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, आज शिवाजी पार्कवर तुम्हाला पाच गोष्टी ऐकू येणार नाहीत, त्या म्हणजे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…, सावरकर वीर होते, आहेत आणि राहतील… मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही…, आम्ही समान नागरी कायद्याचे (UCC) समर्थन करतो…, ३७० कायदा रद्द केल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन. एकूणच उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या सभेला उपस्थित राहणार असल्यावरून देवरांनी ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज ५७व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकत्ता नाईट रायडर्सला २…
कोकणात भारत मातेचा जल्लोष कणकवली : पाकव्याप्त काश्मिरमध्ये भारताने नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करून ते…
ढाका : भारताने 'ऑपरेशन सिंदूर' द्वारे पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणावर हवाई हल्ले केले.यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे…
मुंबई : मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून काही भागांत हलक्या सरी कोसळल्या. हवामान विभागाच्या अंदाजानुसार,…
मुंबई : कॅल्शिअम हाडं आणि दातांना मजबूत करण्यासाठी फार गरजेचे असते. आपल्याला दर दिवसाला किमान…
जळगाव : गेल्या आठवड्यात घसरण झालेल्या सोने आणि चांदी दरात आता पुन्हा वाढ होताना दिसत…