Cabinet Meeting : लोकसभेपूर्वी राज्य सरकारचा निर्णयांचा धूमधडाका!

Share

४८ तासात ४५ मोठे निर्णय, अहमदनगरचे नाव बदलले, मुंबईतील ८ रेल्वेस्थानकांचेही नामांतर!

मुंबई : देशभरात कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीचा आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी राज्यात महत्त्वाचे प्रशासकीय निर्णय आणि आदेश काढण्याचा धडाका सुरु आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीतही शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याबरोबरच वेल्हे तालुक्याचे नामांतर करण्यास मान्यता देण्यात आली.

यापूर्वी ११ मार्चला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने १८ महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यानंतर अवघ्या ४८ तासांमध्ये राज्य सरकारने आणखी २६ महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

  • मराठी भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर(मराठी भाषा विभाग)
  • पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार (गृह विभाग)
  • अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता (सामान्य प्रशासन विभाग)
  • केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या १५३ कोटी हिश्श्याला मान्यता (नगरविकास विभाग)
  • श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार
    (सार्वजनिक बांधकाम विभाग)
  • कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य. ३२०० कोटींचा प्रकल्प (मदत व पुनर्वसन)
  • भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत ५० वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज (वित्त विभाग)
  • राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ (आरोग्य विभाग)
  • महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार, नफ्यात आणणार (दुग्धविकास विभाग)
  • मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता. ३५ गावांना लाभ होणार (जलसंपदा विभाग)
  • मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार. १२५ हेक्टर जमीन सिंचित करणार (जलसंधारण विभाग)
  • शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. आता २५ हजार रुपये अनुदान संस्थाना. (महिला व बालविकास)
  • मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले. (वैद्यकीय शिक्षण)
  • आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार.
    (कौशल्य विकास)
  • कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी ९०२० कोटी एआयआयबी बँकेकडून घेणार. (ऊर्जा विभाग)
  • शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार, ११ हजार ५८५ कोटींच्या प्रकल्पास मान्यता (ऊर्जा विभाग)
  • पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना. प्रशासनात सुधारणा होणार (पशुसंवर्धन व दुग्धविकास)
  • पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता (महसूल विभाग)
  • म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार. युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन (वैद्यकीय शिक्षण विभाग)
  • आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ (सार्वजनिक आरोग्य विभाग)
  • मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार (परिवहन विभाग)
  • मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार.
  • उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता (नगरविकास विभाग)
  • मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटर रस्ते बांधणार. या वर्षात दहा हजार किमी रस्ते (ग्रामविकास विभाग)
  • भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार
  • महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन (महसूल व वन विभाग)
  • जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग. २४५३ कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता (परिवहन विभाग)
  • दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना (पशुसंवर्धन व दुग्धविकास)

वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्याच्या मंत्रिमंडळाचा निर्णय

पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यात राजगड, तोरणासारखे महत्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी २७ वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आज घेता आला. वेल्हे तालुका आणि पुणे जिल्हावासियांची इच्छा पूर्ण करता आली, याचा मनापासून आनंद आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

Recent Posts

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…

7 minutes ago

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…

11 minutes ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

24 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

44 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

1 hour ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

1 hour ago