Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीManoj Jarange Patil : मनोज जरांगे तब्बल ९०० एकरमध्ये जाहीर सभा घेणार!

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे तब्बल ९०० एकरमध्ये जाहीर सभा घेणार!

लोकसभा निवडणुकीपूर्वी केली मोठी घोषणा

बीड : देशभरात सगळीकडे लोकसभा निवडणुकांचे (Loksabha Elections) वारे वाहत आहेत. या निवडणुकीपूर्वीच राज्य सरकारने मराठा समाजाला (Maratha Samaj) १० टक्के आरक्षण (Maratha reservation) देऊ केलं. मात्र, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे असमाधानी असून त्यांच्या मागण्या सातत्याने बदलत आहेत. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी धरुन लावली आहे. तसेच लोकसभा निवडणुकांपूर्वी मराठा समाजासाठी कुणबी प्रमाणपत्र आणि सगेसोयरे अंमलबजावणी करण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. तसेच, आपल्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा विराट सभा घेण्यात येत असल्याचं जरांगे यांनी म्हटलं. बीडमधील (Beed) गाठीभेटी दरम्यान जरांगेंनी जाहीर सभेची घोषणा केली.

ऐन निवडणुकांच्या प्रचाराच्या धुराळ्यात मराठा आरक्षणाचाही धुराळा उडणार असल्याचे चित्र आहे. मनोज जरांगे म्हणाले आहेत की, सरकारचं हे आरक्षण फसवं असून आम्हाला मान्य नाही. ज्यांना या आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे, ते घेतील. मात्र, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यात यावी. यासाठी लवकरच ९०० एकरामध्ये मोठी सभा होईल. त्यासाठी, राज्यभरातील कोट्यवधी मराठा एकत्र येतील, असे जरांगे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीपूर्वी बीड जिल्ह्यात ही विराट सभा होणार असल्याचे संकेत मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहेत. मनोज जरांगे यांच्या या घोषणेनंतर मराठा समाजाने सभेसाठी जागेची पाहणी सुरू केली आहे. काहींनी तर सभेची तयारी देखील सुरू केली आहे. ९०० एकर जागेवर मराठा समाजाची विराट सभा होणार आहे. कुणबी आरक्षण आणि सगेसोयरे अंमलबजावणीची मागणी करणारी ही सभा असणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -