मुंबई : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिल्यानंतरही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) संतप्त आहेत. त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांनी त्यांच्याविरोधात टीकास्त्र उपसले आहे. मनोज जरांगे हे पातळी सोडून भाषा वापरत असल्यामुळे मराठा समाजातील काही लोकांनीही नाराजी दर्शवली आहे. त्यातच भाजप नेते व देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनीही मनोज जरांगे यांना लक्ष्य केले. ‘मनोज जरांगे बडबड बंद करा अन्यथा मराठा समाजच जागा दाखवून देईल!’, असा इशारा त्यांनी जरांगेंना दिला आहे.
मनोज जरांगे पाटील गेले काही दिवस सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट भाषेत टीका करत आहेत. रविवारीदेखील जरांगे पाटील यांनी फडणवीसांनी आपल्याविरोधात डाव रचल्याचा आरोप केला. यावर प्रतिक्रिया देताना प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना फटकारले. त्यांनी म्हटले की, ‘मनोज जरांगे पाटील यांची पुन्हा एकदा नौटंकी सुरु झाली आहे. ते पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका करु लागले आहेत. ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे ते फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवत आहेत’, अशी टीका त्यांनी केली.
पुढे प्रसाद लाड म्हणाले, ‘यापूर्वीही मनोज जरांगेंची स्क्रिप्ट शरद पवारांची होती. आतादेखील ते शरद पवारांची स्क्रिप्ट वाचत आहेत. शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण दिल्यामुळे मराठा समाज सरकारसोबत आहे. मनोज जरांगे अशीच बडबड करत राहिले तर समाज त्यांना नक्कीच जागा दाखवेल’, असे लाड यांनी म्हटले.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…