मुंबई: डाळिंब हे असे फळ आहे ज्यात फायबर, व्हिटामिन आणि आयर्न मोठ्या प्रमाणात असते. हे एक असे फळ आहे जे वर्षभर खायला मिळते. मात्र अनेकजण हे खात नाही. डाळिंब खाल्ल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असता. पोटाच्या पचनासाठी हे अतिशय फायदेशीर आहे. जर तुम्ही दररोज ७ दिवस डाळिंब खाल तर शरीरास खूप फायदा होईल.
जर तुम्हाला हाय बीपीचा त्रास आहे जर डाळिंब जरूर खाल्ले पाहिजे. डाळिंबामध्ये Punicic acid भरपूर प्रमाणात असते. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. याशिवाय ट्रायग्लिसराईडही कमी करण्याचे कामही डाळिंब करते. रक्ताच्या नसा साफ करत हाय बीपी कंट्रोलमध्ये राहतो.
जे डाळिंब खातात अथवा ज्यूस पितात त्यांचा तणाव कंट्रोलमध्ये राहतो. यातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात. सोबतच सायकोलॉजिकल स्ट्रेसही कमी करतात. यामुळे झोपही चांगली येते.
डाळिंब खाल्ल्याने स्टॅमिना वाढतो. यात फ्लेवॉनॉल्स भरपूर असतात यामुळे शरीराची सूज कमी होते. तसेच हाडांशी संबंधित समस्याही कमी होतात.
ज्यांना सतत सुस्ती आणि थकवा जाणवत असतो त्यांच्यासाठी डाळिंब खाणे अतिशय फायदेशीर आहे. डाळिंबामध्ये आढळणारे रेड ब्लड सेल्स वाढवण्यासोबतच शरीराचा थकवा आणि सुस्तीही दूर करतात.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…