Friday, May 9, 2025
HomeदेशLoksabha election: भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी की जुन्या चेहऱ्यांना पुन्हा पसंती, लोकसभा...

Loksabha election: भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी की जुन्या चेहऱ्यांना पुन्हा पसंती, लोकसभा निवडणुकीत कोण असणार उमेदवार?

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. भाजप लवकरच आपल्या उमेदवारांची नावे फायनल करत आहे. पहिल्या उमेदवारांच्या यादीची प्रतीक्षा सारेच जण करत आहे. गुरूवारी भाजपच्या बऱ्याच वेळ बैठका पार पडलाय. विविध राज्यांतील नेत्यांसोबत या बैठकीमध्ये बातचीत करण्यात आली.

आधी पंतप्रधानांच्या निवासस्थानी दोन तास बैठक सुरू होती. ही बैठक संध्याकाळी ७ वाजता सुरू झाली. यानंतर भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत ४ तास विचारमंथन करण्यात आले. भाजपच्या मुख्यालयात रात्री ११ वाजल्यापासून ३ वाजेपर्यंत जागांवर चर्चा केली जात होती.

या दोन्ही बैठकींमध्ये पहिल्या यादीला अंतिम रूप देण्याबाबत विचार करण्यात आला. खास बाब म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या हाती नेतृत्व घेतले आहे. त्यांनी गुरूवारी संध्याकाळी ७ वाजता पंतप्रधान निवासस्थानी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मोठी बैठक केली. यानंतर ते भाजप मुख्यालयात पोहोचले. येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भूपेंद्र यादवह अनेक राज्यातून आलेले नेते उपस्थित होते. दरम्यान, सगळ्यांच्या नजरा याकडेच आहेत की पक्ष या निवडणुकीत जुन्या नेत्यांचे तिकीट कापणा की आपल्या उमेदवारांच्या निवडीत काही नवे प्रयोग करणार. दरम्यान, यावेळेस नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

आगामी लोकसभा निवडणूक एप्रिल-मेमध्ये होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लोकभा निवडणुकीच्या घोषणेआधी भाजप उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील कमकुवत जागेवर आपल्या उमेदवाराची घोषणा करू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार २०१९च्या निवडणुकीत भाजपला ज्या जागांवर अपयश मिळाले होते तेथे संघटन मजबूत करण्याच्या दिशेने काम केले जात आहे. केंद्रीय मंत्र्यांची टीम ग्राऊंडला उतरवण्यात आली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -