मुंबई : महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ (Hee Anokhi Gath) या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा आहे. याचं कारण म्हणजे नुकताच हृदयविकाराच्या झटक्यातून सावरलेला अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या जोडीला गौरी इंगवले (Gauri Ingawale) प्रमुख भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट उद्यापासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार असून चित्रपटाच्या तिकीटावर एक खास ऑफर देण्यात आली आहे. या चित्रपटाच्या एका तिकीटावर एक तिकीट फ्री देण्यात येणार आहे.
‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटामधून गौरी आणि श्रेयसची नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. शिवाय आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक भन्नाट ऑफरही जाहीर केली आहे. १ मार्चला एकावर एक तिकीट फ्री अशी ऑफर असणार आहे.
बूक माय शोवर HEAGBOGO हा कूपन कोड वापरुन तुम्ही ही ऑफर वापरु शकता. आपल्या माणसांच्या सोबतीने पाहा, ‘ही अनोखी गाठ’ ची प्रेक्षकांना १ वर १ फ्री ची स्पेशल ऑफर, मग आजच तिकीट बुक करा, असं कॅप्शन त्यांनी या पोस्टवर दिलं आहे.
महेश मांजरेकर मुव्हिज आणि झी स्टुडिओज निर्मित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटात शरद पोंक्षे, रिषी सक्सेना, दीप्ती लेले, सुरभी भावे हे कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाच्या तिकीटावरील ऑफर फक्त १ मार्च या दिवशीच लागू असणार आहे.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…