नवीन नाशिक : संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे. त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी नविन नाशिक मधील सकल मराठा समाजाच्या वतीने त्रिमूर्ती चौक येथील शिवनेरी फार्मा या ठिकाणी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण तसेच एक दिवशीय बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
यावेळी आशिष हिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. येत्या दिवसात जर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाही किंवा त्यांच्या तब्येतीला काही बरे वाईट झाले तर नविन नाशिक सकल मराठा समाजाकडून मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, त्यानंतर होणा-या सर्व परिणामांची जबाबदारी ही सरकारची असेल.
आजच्या आंदोलनात नविन नाशिक सकल मराठा समाजाचे अध्यक्ष अमोल पाटील, संजय भामरे, विजय पाटील, पवन मटाले, योगेश गांगुर्डे, हर्षल चव्हाण, राम पाटील, जितेंद्र पाटिल, योगेश पाटील, गोपी पगार, विशाल पगार, गौरव भदाने, हर्षद पाटिल, शुभम महाले, राहुल काकळीज, योगेश आहीरे, हरीश शेवाळे आदींसह मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…