नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी (Republic Day 2024) राजधानी दिल्लीत राजपथावरील (Rajpath) चित्ररथ (Chitrarath) पाहण्यासाठी अवघे भारतवासी उत्सुक झालेले असतात. प्रत्येक राज्य दरवर्षी आपल्या राज्याच्या वैशिष्ट्यांप्रमाणे चित्ररथ साकारत असतात. याचे थेट प्रक्षेपण संपूर्ण देशभरात केले जाते. यंदाही याची राजपथावर जोरदार तयारी सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक कर्तव्यपथावरील तालमीमध्ये अवघ्या देशाला पाहायला मिळाली.
दिल्लीमध्ये २६ जानेवारी रोजी होणाऱ्या पथसंचलनात (Parade) ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ (Chhatrapati Shivaji Maharaj) या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार आहे. शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ही शिल्पे साकारण्यात आली आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या देखाव्यावरील संपूर्ण शिल्पे (Sculpture) यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे यवतमाळचे नाव राजधानी दिल्लातही कोरले जाणार आहे.
‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावरील चित्ररथामध्ये महाराजांचा लोकशाहीला अनुसरून असलेला राज्यकारभार अधोरेखित करण्यात आला आहे. चित्ररथाच्या दर्शनी भागात बाल शिवाजींसह आई जिजाऊंची प्रतिकृती आहे. तर, मागे महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, न्यायाचा प्रतीक तराजू, संभाजी महाराज, कामकाजात सहभागी महिला, गाऱ्हाणे मांडणाऱ्या महिलांची दखल घेणारे महाराज आदी दृश्य आहे. सोबतच, हिरकणी, दिपाऊ बांदल, सावित्री देसाई, सोयराबाई, कल्याणच्या सुभेदारांची सून अशा शिवकालीन शूर स्त्रियांच्या प्रतिकृती देखील चित्ररथात आहेत.
या चित्ररथासोबत दानपट्टा, तलवारबाजी, नृत्य आदी कला सादर करण्यात येणार आहेत. ‘भैरी भवानी परफॉर्मिंग आर्टस्’ या ग्रुपचे कलाकार या कला सादर करणार आहेत. तसेच यातील काही कलाकार शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांच्या भूमिका साकारणार आहेत.
चित्ररथ साकारताना तुषार प्रधान (यवतमाळ) आणि रोशन इंगोले (वर्धा) यांनी कला दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली. तर, यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध शिल्पकार यशवंत एनगुर्तीवार (पाटणबोरी, जि. यवतमाळ) शिल्पकला विभागाचा प्रमुख आहे. त्याच्या समुहामध्ये भूषण हजारे (कळंब), सूरज गाऊत्रे (सोनबर्डी, ता. केळापूर), पिंटू भोंग (पहापळ, ता. केळापूर), नितेश बावणे (घाटंजी), अक्षय बावणे, योगेश वहिले, अविनाश बावणे, निखिल दूर्षेट्टीवर, अरुण मेश्राम, सुमीत कानके (सर्व रा. पाटणबोरी) आदी शिल्पकारांचा समावेश आहे. पाटणबोरी येथे यशवंत यांच्या स्टुडिओमध्ये या चित्ररथातील शिल्प साकारले आहे.
२६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, आर्थिक प्रगती आणि मजबूत अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा यांचं दर्शन घडवणारी राज्यांची, केंद्रशासित प्रदेशांची आणि विविध मंत्रालयांचे चित्ररथ दिसतील.
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…