मुंबई: अफगाणिस्तानविरुद्ध(india vs afganistan) खेळवल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील शानदार कामगिरीनंतर यशस्वी जायसवाल(yashaswi jaiswal) आणि शिवम दुबे(shivam dubey) यांचे नशीब चमकणार आहे. बीसीसीआयने या दोन खेळाडूंना बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे. यशस्वी जायसवाल आणि शिवम दुबे यांना या मालिकेनंतर सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या यादीत सामील केले जाऊ शकते. गेल्या वर्षी जेव्हा बीसीसीआयकडून २६ खेळाडूंना हे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते तेव्हा या खेळाडूंचे नाव यात नव्हते.
यशस्वी जायसवालला गेल्या वर्षी टीम इंडियाकडून पदार्पणाची संधी मिळाली होती. पदार्पणानंतर जायसवाल ४ कसोटी आणि १६ टी-२० सामने खेळला आहे. तर शिवम दुबेने गेल्या वर्षी आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती यामुळे त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. शिवम दुबे साधारण तीन वर्षे टीम इंडियातून बाहेर राहिले. दरम्यान, आता दुबेने फलंदाजीत जबरदस्त कामगिरी केली आहे. दुबेने अफगाणिस्तानविरुद्धच्या दोन टी-२० सामन्यात नाबाद अर्धशतक ठोकले.
यशस्वी जायसवाल आणि शिवम दुबेने या वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठीही दावेदारी मजबूत केली आहे. टीम मॅनेजमेंटने स्पष्ट केले की रोहित शर्मासोबत यशस्वी जायसवाल फर्स्ट चॉईस ओपनर आहे. जर जायसवालने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली तर त्याला विश्वचषक खेळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
तर शिवम दुबेने ऑलराऊंडर म्हणून दावेदारी सादर केली आहे. हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्याने बॅकअप ऑलराऊंडरम्हणून संघाकडून शिवम दुबेपेक्षा चांगला पर्याय नाही. शिवम दुबेला संघात कायम राहण्यासाठी स्वत:ला आणखी सिद्ध करावे लागेल. गेल्यावर्षीप्रमाणेच त्याने यंदाच्या आयपीएलमध्येही चांगली कामगिरी कायम ठेवली तर हार्दिक पांड्याला ते भारी पडू शकते.
श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…