मुंबई : गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढणार्या शिवसेनेतील पक्षफुटीवर (Shivsena Split) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) उद्या अंतिम निर्णय देणार आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षात बंड करत काही आमदारांना सोबत घेऊन महाराष्ट्रात केलेल्या जादूमुळे आजवर ठाकरे गटाच्या (Thackeray Group) अनेक बड्या बड्या नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंचे नेतृत्व पत्करले. त्यानंतर या दोन्ही गटातील वाद विकोपाला गेले आणि शिवसेना नेमकी कोणाची हा प्रश्न निर्माण झाला. या ऐतिहासिक राजकीय पेचावर उद्या बुधवारी, १० जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता निकाल दिला जाणार आहे.
शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात दोन्ही गटांच्या याचिकांवर १४ सप्टेंबर ते २० डिसेंबरपर्यंत विधानसभेच्या अध्यक्षांसमोर मॅरेथॉन सुनावणी झाली. त्यानंतर सुमारे ५०० पानांचे निकालपत्र तयार करण्याचे काम सध्या सुरु आहे. विधानसभा अध्यक्ष विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये या निकालाचे वाचन करणार आहेत. मागील सुमारे दीड वर्षांपासून अत्यंत चर्चेच्या आणि राजकीय वादाच्या ठरलेल्या या मुद्द्यावरील निकालाकडे संपूर्ण राज्याचे आणि देशाचेही लक्ष लागले आहे.
आमदार अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात तब्बल १० महिने झालेल्या सुनावणीनंतर १४ मे २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत, पक्ष कोणाचा ते ठरविण्याची तसेच आमदार पात्रता ठरविण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपविली. यानंतर निकालासाठी तारखांमध्ये दोनदा मुदतवाढ करण्यात आली आणि अखेरीस १० जानेवारी ही तारीख देण्यात आली. त्यानुसार आता उद्या हा निकाल लागणार आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोणताही स्पष्ट निकाल न देता सर्वोच्च न्यायालयाकडे (Supreme court) प्रकरण वर्ग करण्याचा पर्याय अध्यक्षांकडे नाही. त्यांना एक निकाल द्यावा लागेल. अध्यक्षांनी कोणत्याही बाजूने निकाल दिला तरी ते प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडे जाणारच आहे. कारण एक गट नाराज होणारच आहे आणि तो सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेणार आहे. यातला मधला मार्ग काढणे अपेक्षित नाही. त्यांना पात्र किंवा अपात्र ठरवावे लागेल. त्यामुळे आता अध्यक्ष काय निकाल देतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…