Friday, May 9, 2025
Homeसाप्ताहिकमजेत मस्त तंदुरुस्तMushrooms: मशरूमचे हे फायदे वाचून तुम्ही लगेचच खाण्यास कराल सुरूवात

Mushrooms: मशरूमचे हे फायदे वाचून तुम्ही लगेचच खाण्यास कराल सुरूवात

मुंबई: काही जणांना मशरूम(mushroom) खायला आवडत नाही. तुमचेही उत्तर जर हा असे आहे तर याचे एकदा फायदे जाणून घ्या थंडीच्या दिवसांत अनेक आजार आपल्या अवतीभवती असतात. अशातच आपले डाएट योग्य ठेवणे गरजेचे असते. या बदलत्या वातावरणाशी लढण्यासाठी आपण निरोगी असणे गरजेचे असते. अशातच मशरूम ही अशी गोष्ट आहे जी तुमच्या शरीराला अनेक फायदे मिळवून देते. मशरूम आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. हे तुम्ही सॅलड, सँडविच, पिझ्झा, मिक्स व्हेज, मंच्युरियन म्हणून खाऊ शकता.

व्हिटामिन डी मोठ्या प्रमाणात

व्यस्त वेळापत्रकामुळे अनेकांना उन्हात बसायला वेळ मिळत नाही. त्यामुळे व्हिटामिन डीची कमतरता होते. अशातच तुम्ही व्हिटामिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी मशरूमचे सेवन करू शकता.

पोषकतत्वांनी भरपूर

मशरूममध्ये व्हिटामिन डी, बी, सेलेनियम, पोटॅशियम आणि कॉपर मोठ्या प्रमाणात असते. हे व्हिटामिन्स शरीरााल विविध आजारांशी लढण्यास मदत करतात. सोबतच आरोग्य चांगले राखतात.

इम्युनिटी वाढते

मशरूममध्ये बायोअॅक्टिव्ह कंपाऊंड मोठ्या प्रमाणात असतात जे इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात. यात बीटा ग्लुकेन नावाचे तत्व असते जे थंडीत येणाऱ्या सर्दी तापासासाठी तसेच इन्फेक्शनविरोधात लढण्यास मदत करते.

अँटीऑक्सिडंटचा खजाना

मशरूम्समध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असतात जे सेल्युलार हेल्थ मजबूत करतात आणि स्ट्रेस रिलीज करतात.

वेट लॉसमध्ये फायदेशीर

वजन घटवण्यासाठी जे लोक दिवसरात्र मेहनत करत आहेत त्यांनी आपल्या डाएटमध्ये मशरूम्सचा समावेश करावा. यातील फायबर्स फॅट कमी करण्यास मदत करतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -