मुंबई: थंडीच्या दिवसात आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि आपण आजारी पडतो. अशातच तूप आणि काळी मिरीच्या सेवनाने अनेक आजारांवर उपचार करता येऊ शकतात. तुपामध्ये व्हिटामिन ए, ई, के आणि ओमेगा ३ सारखी पोषकतत्वे असतात जे शरीराला आतून मजबूत करतात. तर काळ्या मिरीमध्ये आढळणारे अँटीबॅक्टेरियल गुण इन्फेक्शनपासून लढण्यास मदत करतात. हे दोन्ही मिसळून खाल्ल्याने अनेक फायदे होतात.
तूप आणि काळी मिरीचे सेवन आपली रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करण्यास मदत करतात. तुपामध्ये व्हिटामिन ए, ई आणि के ही जीवनसत्वे आढळतात. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता सुधारण्यास मदत होते. काळी मिरीमधील अँटी ऑक्सिडंट फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. या पद्धतीने दोन्हींचे मिश्रण आजारांशी लढण्यास मदत करतात.
थंडीच्या दिवसांत सर्दी-खोकल्यासारख्या समस्या होणे ही सामान्य बाब आहे. अशातच तूप आणि काळी मिरी खाल्ल्याने फायदा होतो. तुपातील उष्णतेमुळे शरीराला ऊब मिळते आणि श्वास नलिका साफ होण्यास मदत होते. तसेच काळी मिरीलमधील कॅप्सेसिन नावाचे तत्व इन्फेक्शनशी लढणाऱ्या प्रोटीनचे उत्पादन करते. हे दोन्ही मिसळून सेवन केल्याने सर्दी-खोकल्यापासून सुटका मिळते.
थंडीच्या दिवसात सांधेदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणावर जाणवतो. मात्र तूप आणि काळी मिरीच्या सेवनाने यामुळे आराम मिळू शकते. तुपामधील उबदारपणामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. यामुळे सांध्यांना वंगण मिळते. तसेच काळ्या मिरीमध्ये इन्फ्लामेंटरी गुण असतात जे सूज कमी करतात.
तज्ञांच्या मते तूप आणि काळी मिरी खाल्ल्याने हृदय आणि लिव्हरचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. तुपामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते जे हृदय रोगांचा धोका कमी होतो. यामुळे रक्त संचलन चांगल्या पद्धतीने होते. तसेच हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…