लखनऊ: अयोध्या जंक्शन(ayodhya junction) आता अयोध्या धाम जंक्शनच्या रूपात ओळखले जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची इच्छा पूर्ण झाली आहे. रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याचे आदेश बुधवारी संध्याकाळी उशिरा देण्यात आले. भाजप खासदार लल्लू सिंह यांनी सोशल मीडियावर यासंबंधी ट्वीट केले. गेल्या काही दिवसांआधी अयोध्या जंक्शनची पाहणी करताना स्थानकाचे नाव बदलण्याची इच्छा सीएम योगीने जाहीर केली होती.
सोशल मीडियाच्या माध्यमातून खासदार लल्लू सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. आता अयोध्या धाम जंक्शनच्या नावाने अयोध्या जंक्शन ओळखले जाणार आहे. ३० डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकाच्या नव्या बिल्डिंगचे उद्घाटन करतील.
पंतप्रधान मोदी करणार अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचे उद्घाटन
रामदेवाच्या प्राण प्रतिष्ठेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० डिसेंबरला अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करतील. अयोध्या धाम रेल्वे स्टेशन बनून तयार आहे. १ जानेवारीपासून सामान्य भक्तांसाठी हे स्थानक खुले असणार आहे. पंतप्रधान मोदी अयोध्या धाम रेल्वे स्टेशन येथून वंदे भारत आणि अमृत भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवून रवाना करतील. श्रीराम आंतरराष्ट्रीय एअरपोर्टचेही पंतप्रधान मोदी लोकार्पण करतील.