Tripti Dimri Animal : तू असं करायला नको होतं…

Share

तृप्तीच्या ‘अ‍ॅनिमल’ मधील इंटिमेट सीन्सवर पालकांसह तृप्तीचीही प्रतिक्रिया आली समोर

मुंबई : सध्या बॉक्स ऑफिसवर (Box office) ‘अ‍ॅनिमल’ (Animal) हा चित्रपट चांगलाच धुमाकूळ घालत आहे. यात जे कलाकार ट्रेलरमध्ये फारसे दिसलेही नव्हते त्यांचीच चर्चा होत असल्याचं दिसत आहे. मराठी कलाकार उपेंद्र लिमये (Upendra Limaye) याच्या ‘अ‍ॅनिमल’मधील कामाचं भरभरुन कौतुक होत आहे. तर अभिनेत्री तृप्ती डिमरीचीही (Tripti Dimri) प्रचंड चर्चा होत आहे. तिचं काम चाहत्यांना भलतंच आवडलं आहे.

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात तृप्तीने रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) अनेक इंटिमेट सीन्स (Intimate scenes) दिले आहेत. या सीन्सचीही सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड चर्चा आहे. यापूर्वी तृप्तीने ते सीन कसे शूट झाले होते आणि दिग्दर्शक संदिप रेड्डी (Sandeep Reddy) आणि रणबीरने ती परिस्थिती कशी हाताळली हे सांगितले होते. आता तिच्या या इंटिमेट सीनवर तिच्या पालकांची कशी प्रतिक्रिया होती हे तिने सांगितले आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या मुलीला अशा भूमिकेत पाहून तिच्या आईवडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

रणबीर कपूरसोबतचे ते इंटिमेट सीन पाहून पालकांना धक्का बसल्याचे तृप्तीने सांगितले. ते म्हणाले, ‘आम्ही चित्रपटांमध्ये असं काही यापूर्वी पाहिलं नाही आणि तू ते केलं.’ त्या सीन्समधून सावरायला त्यांना थोडा वेळ लागला. ते पुढे म्हणाले, ‘तू हे करायला नको होतं, पण ठीक आहे. पालक या नात्याने आम्हाला असं वाटणं सहाजिक आहे, असा खुलासा तृप्तीने केला.

पुढे ती म्हणाली, ‘मी त्यांना सांगितले की मी काहीही चुकीचे केले नाही. हे माझे काम आहे आणि जोपर्यंत मी सुरक्षित आहे तोपर्यंत मला ते करण्यात काहीही अडचण वाटत नाही. मी एक अभिनेत्री आहे आणि मी साकारलेल्या व्यक्तिरेखेशी मी १०० टक्के प्रामाणिक असलं पाहिजे आणि मी ते केले.’

तृप्ती डिमरीने ‘लैला मजनू’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ‘बुलबुल’ आणि ‘कला’मध्येही तिने काम केले आहे. मात्र तृप्ती डिमरीसाठी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट टर्निंग पॉइंट ठरला. आता ती अनिल रविपुडी यांच्या आगामी ‘मास महाराजा’ या चित्रपटातून साऊथ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

Recent Posts

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

13 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

16 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

52 minutes ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

1 hour ago

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

3 hours ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

3 hours ago