Mahua Moitra : महुआ मोईत्रा सीबीआयच्या फेऱ्यात

Share

तृणमूल काँग्रेसच्या सांसद महुआ मोईत्रा यांचे ‘कॅश फॉर क्वेरी’ हे प्रकरण सध्या चिघळले आहे. मोईत्रा यांच्यावर दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेऊन अदानी यांना लक्ष्य करणारे प्रश्न विचारल्याचा आरोप मोईत्रा यांच्यावर आहे. संसदेच्या समितीने मोईत्रा यांना या प्रकरणी दोषी ठरविले असून त्यांची संसद सदस्यता अपात्र ठरण्याची टांगती तलवार आहे. पण आता या प्रकरणात सीबीआयचा प्रवेश झाला असल्याने मोईत्रा या आणखी अडचणीत आल्या आहेत. त्यांच्याविरोधात सीबीआयला चौकशी करण्याची परवानगी देण्यात आल्याने मोईत्रा यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. त्यांनी अदानी यांना लक्ष्य करण्यासाठी प्रश्न विचारले आणि ते थोडेथोडके नव्हे तर तब्बल ४२ प्रश्न आहेत. यासाठी त्यांना दर्शन हिरानंदानी यांनी पैसे दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढ्यावरच मोईत्रा थांबल्या नाहीत, तर त्यांनी आपला ईमेल हिरानंदानी यांना शेअर केल्याचाही आरोप आहे.

आता समितीने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस केली आहे. पण सीबीआयकडे हे प्रकरण चौकशीसाठी गेल्याने मोईत्रा यांना अटकही होऊ शकते. तृणमूल काँग्रेसची प्रतिमा यामुळे धुळीस मिळाली आहे. निशिकांत दुबे या भाजपा खासदाराने हे प्रकरण चव्हाट्यावर आणले. मोईत्रा या उच्चशिक्षित आहेत. त्यांनी अमेरिकन कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम केले आहे. अशा महिला खासदाराचे अधःपतन होण्याचे भारतीय संसदीय इतिहासातील हे एकमेव उदाहरण नाही. यापूर्वीही अनेक खासदारांवर अपात्र ठरण्याची कारवाई करण्यात आली होती. पण मोईत्रा यांचे प्रकरण वेगळे आहे. मोईत्रा यांच्यावर वेगवेगळे आरोप आहेत आणि त्यांचा सिगारेट ओढतानाचे तसेच मद्यपान करतानाचे छायाचित्रही व्हायरल झाले आहे. अर्थात त्यांचा हा खासगी प्रश्न म्हणून सोडून देता येईल. पण राज्यसभेत बसणारी एक महिला खासदार अगदी सर्वांसमोर सिगारेट ओढते ही काही भारतीय महिलांचा सन्मान वाढवणारी बाब नाही. आता मोईत्रा यांच्या प्रकरणाने आणखी एक बाब झाली आहे आणि ती म्हणजे त्यांच्यानिमित्ताने साऱ्या संसद सदस्यांचे ईमेल वापरण्यावर समितीने बंधने आणली आहेत. त्यामुळे खासदारांचा जो खासगी कर्मचारी वर्ग आहे, त्याच्यावर मोठेच संकट ओढवले आहे.

खासदारांनी आपले लॉगइन तपशील खासगी किंवा अनधिकृत लोकांना देऊ नये, असा नियम करण्यात आला आहे. याबद्दल वाद होण्याचा प्रश्नच नाही. मोईत्रा यांनी आपल्या ईमेलचा तपशील दुबई स्थित दर्शन हिरानंदानी यांना सामायिक केला, हा वादाचा मुद्दा आहे. कारण ते काही मोईत्रा यांचे खासगी कर्मचारी वर्गात मोडत नाहीत. दुबे यांच्या आरोपानुसार, मोईत्रा यांनी हिरानंदानी यांच्याकडून लाच घेऊन अडानी यांना लक्ष्य करणारे प्रश्न विचारले. एका खासदाराने एका उद्योगपतीकडून पैसे घेऊन दुसऱ्या उद्योगपतीला लक्ष्य करण्यात आल्याचे हे प्रकरण अत्यंत खळबळजनक आहेच. पण मोईत्रा यांच्याबद्दल संशय व्यक्त करणारे आहे. महुआ मोईत्रा यांचे समर्थन त्यांच्या पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यानी केले आहे. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई तर राहूच द्या, मोईत्रा यांच्या समर्थनार्थ ममता उभ्या राहिल्या आहेत. लोकसभा नियमांचा गंभीर भंग केल्याप्रकरणी संसदेच्या तत्त्वपालन समितीने त्यांना अपात्र ठरवावे, अशी शिफारस केली आहे. मोईत्रा यांना या प्रकाराची जराही खंत नाही. त्यांची भाषा तशीच राहिली आहे. पण मोईत्रा यांच्या प्रकरणामुळे संसद खासदारांच्या नीतीमत्तेविषयी संशय उत्पन्न झाला आहे. यापुढे कुणाही खासदाराने एखादा प्रश्न विचारला तर तो प्रामाणिक हेतूने आहे की नाही, याचा लोकांना संशय येणार आहे. खासदारांची नीतीमत्ता या दृष्टीने धोक्यात आली आहे. मोईत्रा यांच्यामुळे सर्वच खासदारांवर संशय व्यक्त करण्यात येऊ शकतो आणि त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाऊ शकते. महुआ मोईत्रा यांच्या मते त्यांनीही काहीही गैर केले नाही. त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांनी बजावला आहे. इतके साधे हे प्रकरण नाही. अन्यथा संसदेच्या तत्त्वपालन समितीकडे हे प्रकरण कशाला गेले असते. मुळात एका त्रयस्थ व्यक्तीला आपला ईमेल तपशील उघड करणे हाच मोठा त्यांचा अपराध आहे. त्यातून त्यांना शिक्षा व्हायची ती होईल. लाच घेऊन एखाद्याला लक्ष्य करण्यासाठी प्रश्न विचारणे हा दुसरा मोठा अपराध आहे.

मोईत्रा यांच्या या प्रकरणामुळे भारतीय महिला खासदारांची प्रतिमा डागाळली आहे. हा तिसरा मोठा परिणाम आहे. ममता बॅनर्जी याही आता मोईत्रा यांना वाचवू शकत नाहीत. याचे राजकीय परिणामही होणार आहेत. सीबीआयने त्यांना अटक केली तर केवळ मोईत्राच नव्हे तर सारा पक्षच अडचणीत येणार आहे. लोकसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटत राहणार आहेत. त्यावेळी ममता यांना मोईत्रा यांची पाठराखण करण्याची किमत मोजावी लागेल. ममता या स्वतःला पंतप्रधान मोदी याना पर्याय म्हणून समोर येण्याच्या प्रयत्नात होत्या. त्यांच्या या मोहिमेस मोठाच धक्का बसला आहे. संसदेच्या डिजिटल पोर्टलला खासदारांना अक्सेस द्यायचा की नाही, हाही गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. मोईत्रा यांनी लाच घेऊन प्रश्न विचारले की नाही हा तर वेगळाच मुद्दा आहे. तो आरोप सिद्ध करणे सोपेही आहे. कारण दर्शन हिरानंदानी यांनीच मोईत्रा यांना पैसे दिल्याची कबुली देणारे पत्र लोकसभा सचिवालयाला लिहिले आहे. एकूण मोईत्रा प्रकरण भारतीय संसदेच्या इतिहासातील एक वेगळे प्रकरण म्हणून कायमचे नोंदले जाईल. पण सर्वात मोठा धक्का हा ममता बॅनर्जी यांना बसणार आहे कारण त्यांचीही विश्वासार्हता या प्रकरणी पणाला लागली आहे.

Recent Posts

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

27 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

29 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

49 minutes ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

1 hour ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

1 hour ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

2 hours ago