मुंबई : काल क्रिकेट विश्वचषकातील (Cricket World Cup 2023) भारताच्या पराभवानंतर भारतीय संघाला (Team India) अवघ्या भारताकडून पाठिंबा मिळत आहे. पुढच्या सामन्यांमध्ये दमदार खेळी करत राहा अशा शुभेच्छा दिल्या जात आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे क्रिकेटप्रेम तर सर्वश्रुत आहे. त्यांनीही टीम इंडियाला ट्विट करत पाठिंबा दिला आहे. मात्र, न्यूझीलंडसोबत झालेल्या भारताच्या सेमीफायनल सामन्यानंतर केलेल्या एका मजेशीर ट्विटमुळे बिग बींना ट्रोलही केलं जात आहे.
कालच्या सामन्यानंतर अमिताभ बच्चन यांनी आपल्या एक्स अकाऊटवरुन एक ट्विट केलं. यात टीम इंडियाला उद्देशून ते म्हणाले, “काल रात्रीच्या सामन्याचा निकाल हा तुमच्या टॅलेंटचं, क्षमतेचं आणि स्थिरतेचं प्रतिबिंब नव्हतं. पण मला तुमचा अभिमान आहे. भविष्यात टीमसाठी चांगल्या गोष्टी घडतील, असंच चांगलं खेळत राहा.” असं म्हणत अमिताभ यांनी टीम इंडियाला प्रोत्साहित केलं आहे.
तर दुसरीकडे काही नेटकरी अमिताभ बच्चन यांनी सेमीफायनल सामन्यानंतर केलेल्या ट्विटमुळे त्यांना ट्रोल करत आहेत. ‘मी जेव्हा सामना पाहत नाही तेव्हा आपण जिंकतो’, असं मजेशीर ट्विट बच्चन यांनी केलं होतं. मात्र, काल पराभवाची चाहूल लागल्यापासूनच ‘बच्चन सामना पाहायला बसलेत का?’, अशा आशयाचे मीम्स व्हायरल होत आहेत. फायनलचा सामना तुम्ही पाहिला नाहीत ना? असा सवाल काहींनी केला. त्यामुळे विश्वचषकाइतकीच बच्चन यांनी सामना पाहिला की नाही याचीही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…