Elvish Yadav : एल्विश यादव प्रकरणात वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर

Share

रेव पार्टी, सापाचे विष, परदेशी मुलींचा ‘सप्लाय’

नोएडा : ‘बिग बॉस ओटीटी’चा विजेता एल्विश यादव (Bigg Boss OTT Winner Elvish Yadav) अडचणीत आला आहे. प्रसिद्धीझोतात आलेल्या या युट्यूबर विरोधात नोएडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रेव पार्टीत विषारी सापांचं विष पुरवणं, परदेशी मुलींचा ‘सप्लाय’ करणं असे अनेक आरोप एल्विशवर लावण्यात आले आहेत.

नोएडातील रेव्ह पार्टीवरील छाप्यादरम्यान त्याच्यासह आणखी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेव पार्टी, सापाचं विष, परदेशी मुलींचा ‘सप्लाय’ केल्याने एल्विश यादव चर्चेत आहे. आता या प्रकरणाचा वैदकीय अहवाल समोर आला आहे. या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वनविभागातर्फे सापांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासात पाच कोब्रा विषारी असल्याचे तर चार साप विषारी नसल्याचं उघड झालं आहे. डेप्युटी सीव्हीओच्या पॅनेलतर्फे वैद्यकीय प्रशिक्षण करण्यात आलं आहे. विषारी सापाची विक्री करणं हा कायदेशीर गुन्हा आहे. यामुळे गुन्हेगाराला सात वर्षापर्यंतची शिक्षा भोगावी लागते. न्यायालयाच्या परवानगीनंतर सापांना जंगलात सोडण्यात आले आहे.

दरम्यान, या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं एल्विश म्हणाला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांना सहकार्य करण्यास तो तयार आहे. मनेका गांधी यांच्याशी संबंधित असलेल्या पीएएफ संस्थेला माहिती मिळाली होती की, एल्विश यादव ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवतो. विषारी सापांचे व्हिडीओ शूट करतो. परदेशी मुलींचा ‘सप्लाय’ करतो. त्यामुळे त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या एल्विशवर गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

Recent Posts

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

30 minutes ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

53 minutes ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

5 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

5 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

6 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

6 hours ago