सिंधुदुर्ग : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Grampanchayat Elections) काल रविवारी पार पडल्या. राज्यभरातल्या २ हजार ३६९ ग्रामपंचायतींची आज मतमोजणी होत आहे. आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने यावेळी जनतेचा कौल कोणाकडे आहे? हे या निवडणुकींतून आजमावता येणार आहे. यातील काही निवडणुकांचे निकाल हाती आले असून पुन्हा एकदा महायुतीचीच सत्ता येणार, हे स्पष्ट झाले आहे. महायुतीत सामील असणार्या पक्षांनी आतापर्यंत सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
सिंधुदुर्गात (Sindhudurga) तळकोकणात भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांची जादू कायम आहे. कणकवलीतील ओटव ग्रामपंचायत भाजपकडे आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण राणे कुटुंबियांचं सिंधुदुर्ग भागात मोठं वर्चस्व आहे. कोकणसाठी अनेक विकासकामं राणे कुटुंबियांनी केली आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही त्यांचाच दबदबा कायम राहिला आहे.
दरम्यान, आतापर्यंतच्या निकालानुसार भाजपनेच सगळ्यांत जास्त जागा जिंकल्या आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार,
भाजप – १५१ जागा
अजित पवार गट – १२६ जागा
शिवसेना – ९८ जागा
काँग्रेस – ६८ जागा
ठाकरे गट – ६० जागा
शरद पवार गट – ५६ जागा
इतर – ८८ जागा
आतापर्यंत एकूण ३७५ जागा मिळवत महायुतीची यशस्वी घोडदौड सुरु आहे. तर मविआला १८४ व इतर पक्षांना ८८ जागा जिंकता आल्या आहेत.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…