Ekda Yeun tar Bagha : हास्यरथी महारथींच्या अभिनयाने सजलेला ‘एकदा येऊन तर बघा’!

Share

लेखक, दिग्दर्शक म्हणून प्रसाद खांडेकरचा पहिलाच सिनेमा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Cine Industry) अनेक नवनवे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यातच मराठी टेलिव्हिजन विश्वात आघाडीच्या असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra), ‘फू बाई फू’ (Fu Bai Fu), ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa yeu dya) या कॉमेडी शोजमधून (Comedy show) आपल्या विनोदी अभिनयाने महाराष्ट्राला खळखळून हसवणारे कलाकार एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यानिमित्ताने सगळ्यांचा लाडका विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकरने (Prasad Khandekar) पहिल्यांदाच एका चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तसेच या चित्रपटाचे लेखनही प्रसादनेच केले आहे.

विनोदाचा तडका असलेल्या या चित्रपटाचे नावही तितकेच धमाकेदार आहे. ‘एकदा येऊन तर बघा’ नावाचा हा सिनेमा २४ नोव्हेंबर २०२३ला प्रदर्शित होणार आहे. गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात पाहायला मिळेल. या पाच जणांसोबत सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, राजेंद्र शिसातकर, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार आदि कलाकारांची भली मोठी फौज सिनेमात आहे.

फुलंब्रीकर नावाच्या भन्नाट कुटुंबाची आणि त्यांच्या नात्यातील गंमत सांगणारी श्रावण, फाल्गुन आणि कार्तिक या तीन भावांची गोष्ट म्हणजे ‘एकदा येऊन तर बघा’ हा सिनेमा. फुलंब्रीकर कुटुंब हॉटेल व्यवसाय सुरू तर करतात पण ग्राहक यावेत यासाठी त्यांना काय आणि किती प्रयत्न करावे लागतात? ज्या गिऱ्हाईकांची वाट बघत आहेत ते गिऱ्हाईक हॉटेल मध्ये आल्यावर हे कसे एका प्रॉब्लेम मध्ये अडकत जातात आणि मग पुढे काय होतं ? त्यातून त्यांच्यावर कोणकोणते प्रसंग ओढवतात आणि त्याला ही मंडळी कशी सामोरी जातात? याची गंमतीशीर गोष्ट या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. हे कुटुंब प्रेक्षकांना निखळ हास्याची मेजवानी देईल, असा विश्वास दिग्दर्शक प्रसाद खांडेकरने व्यक्त केला आहे.

Recent Posts

बॉलीवूड सेलिब्रिटींनी केले भारतीय जवानांच्या शौर्याचे कौतुक!

श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…

29 minutes ago

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…

2 hours ago

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…

2 hours ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

2 hours ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

2 hours ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

3 hours ago