नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाजाची निवडणूक होऊन तब्बल एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. तरीदेखील अद्यापही बहुतांश शाळा व महाविद्यालयांमध्ये मागील पंचवार्षिक निवडणुकीत विजय झालेल्या अध्यक्ष, सरचिटणीस, इतर कार्यकारणी पदाधिकारी व सदस्यांची नावे फलकावर दिसून येत असल्याने मविप्रचे सरचिटणीस नेमके कोण ? ॲड. नितीन ठाकरे की निलिमा पवार ? असा प्रश्न येथे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिक, विद्यार्थी, पालक व सदस्यांमध्ये पडल्याचे दिसून येत आहे. अशाच प्रकारचा एक फलक सिडकोतील होराईझन इंग्लिश मीडियम स्कूल येथे दर्शनी भागावर दिसून येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय व मोठी शैक्षणिक संस्था म्हणून मराठा विद्या प्रसारक संस्थेचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते घेतले जाते. अनेक शाखामध्ये अनेक शैक्षणिक अभ्यासक्रम शिकविले जातात. संस्थेचे सभासद, विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दर पाच वर्षांनी होणारी निवडणूक हा महाराष्ट्रातील मोठा चर्चेचा विषय ठरतो. नुकतीच या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. अध्यक्ष सोडून सत्ताधारी पॅनलचा पार धुआ उडाला. ॲड. नितीन ठाकरे यांच्या पॅनलने विजय संपादन केला. विजयाचा गुलाल उधळला. त्यामुळे राज्यभरात एकच चर्चा झाली.
नाशिक जिल्हाभर चर्चेत असलेल्या प्रसिद्ध मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने प्रगती पॅनलला धूळ चारली होती. या विजयासोबतच तब्बल २४ वर्षानंतर मविप्र संस्थेत ॲड. नितीन ठाकरेंच्या नेतृत्वात परिवर्तन घडले होते. सत्ताधारी आणि विरोधी गटांकडून आरोप प्रत्यारोपांनी मराठा विद्या प्रसारक संस्था संचालक मंडळ निवडणूक चांगलीच गाजली होती. या लक्षवेधी निवडणुकीत निलीमा पवार यांचे प्रगती पॅनल तर ॲड. नितीन ठाकरे प्रणित परिवर्तन पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली. २१ पैकी तब्बल २० जागांवर परिवर्तन पॅनलने झेंडा फडकवला होता. शेवटी बारा वाजेच्या सुमारास अखेरचा निकाल हाती आला होता. परिवर्तन पॅनलने मविप्र संस्थेवर एक हाती सत्ता मिळवली.
मराठा विद्या प्रसारक संस्था म्हणजे नाशिक जिल्ह्यातील शिक्षण वाहिनी समजली जाते. इथल्या पिढ्यापिढ्यांना शिक्षित आणि सुसंस्कृत करण्याचं कार्य मविप्रच्या माध्यमातून सातत्यानं होत आले. कर्मवीर रावसाहेब थोरातांपासून ते कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांच्या पर्यंतची मोठी परंपरा मविप्र संस्थेस लाभली. या संस्थेच्या कार्यकारी मंडळाची अटीतटीची निवडणूक झाली. यामध्ये जवळ जवळ सर्वच राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधी दरम्यान राज्यातील काही मोजक्या शिक्षण संस्थांमध्ये लोकशाही पद्धतीने मतदान करुन संचालकांची निवड केली. त्यात मविप्रचा समावेश आहे. मविप्र संस्थेत १० हजार १९७ मतदार असून प्रत्येक तालुक्यातील मतदार हा अन्य तालुक्यांतील संचालक निवडीसाठीही मतदान करतो. त्यामुळे तालुक्याचा संचालक जिल्ह्यातील मतदानावर निवडून येतो. २९०३ एवढे सर्वाधिक मतदार निफाड तालुक्यात आहेत. सटाणा येथे १ हजार ४१६ मतदार आहे. सात कमी मतदार संख्या इगतपुरीत १३८ आहे.
गेल्या २५ वर्षांपासून प्रगती पॅनलची मविप्र संस्थेवर सत्ता होती. अखेर ठाकरे यांच्या रुपात नवे सरचिटणीस मविप्र संस्थेला मिळाले. तत्पूर्वी प्रगती पॅनलच्या निलीमा पवार या बारा वर्षे सरचिटणीस पदावर कार्यरत होत्या. मात्र संस्थेत परिवर्तन घडविण्याच्या उद्देशाने आलेल्या ॲड. नितीन ठाकरे यांनी कसून मेहनत घेत मविप्रवर झेंडा फडकवला. मविप्र संस्थेत परिवर्तन घडवून आणण्याची उद्देशाने मैदानात उतरलेले ॲड. नितीन ठाकरे परिवर्तन घडविले.
दरम्यान मविप्र संस्थेच्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान हे निफाड तालुक्यात येतात. मात्र विशेष म्हणजे मविप्र निवडणुकीत दहा हजार १९७ मतदार असले तरी सर्वाधिक २९०३ मतदार हे निफाड तालुक्यातील आहेत. त्यामुळे इतर तालुक्यांपेक्षा निफाड तालुक्याला संस्थेच्या दृष्टीने आणि निवडणुकीच्या दृष्टीने मोठे महत्त्व प्राप्त झाले.
अध्यक्ष : डॉ. सुनील उत्तमराव ढिकले
उपाध्यक्ष : मोरे विश्वास बापूराव
सभापती: क्षीरसागर बाळासाहेब रामनाथ
उपसभापती: मोगल देवराम बाबुराव
चिटणीस: ॲड. ठाकरे नितीन बाबु
चिटणीस: दळवी दिलीप सखाराम
महिला सदस्य : बोरस्ते शोभा भागवत व
सोनवणे शालन अरुण
इगतपुरी गुळवे संदीप गोपाळराव
कळवण : देवरे रवींद्र शंकर
दिंडोरी : जाधव प्रवीण एकनाथ
नाशिक शहर : लांडगे लक्ष्मण फकिरा
बागलाण : डॉ. सोनवणे प्रसाद प्रभाकर
मनमाड : गडाख शिवाजी जयराम
नांदगाव : पाटील (बोरसे) अमित उमेदसिंग
चांदवड : डॉ. गायकवाड सयाजीराव नारायणराव
देवळा : पगार विजय पोपटराव
मालेगाव : ॲड. बच्छाव रमेशचंद्र काशिनाथ
सिन्नर : भगत कृष्णाजी गणपत
येवला : बनकर नंदकुमार बालाजी
नाशिक ग्रामीण : पिंगळे रमेश पांडुरंग
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…