अमेरिकेतील नोकरी सोडून अभिनयासाठी भारतात राहण्याचा निर्णय तिने घेतला. जाहिरात व अभिनयामध्ये आपला जम बसविला व आज अभिनयामध्ये उत्तुंग यश मिळवलं, ती अभिनेत्री म्हणजे स्मिता गोंदकर होय.
स्मिताचे पुण्याच्या सेंट मीरा व मुक्तांगण शाळेत शालेय शिक्षण झाले. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात ती भाग घ्यायची. स्पोर्ट्समध्ये ती अव्वल होती. नॅशनल ज्युडो प्लेअर होती. रोईंगच्या खेळाची कर्णधार होती. तिने हॉटेल मॅनेजमेंट केलं. बाईक रेसिंगमध्ये ती अव्वल होती. तिला पोलिसाच्या नोकरीची ऑफर आली होती; परंतु तिने नोकरीसाठी अमेरिका गाठली. सारं काही व्यवस्थित चाललं होतं. तीन महिन्यांच्या सुट्टीवर ती भारतात आली. तिच्या मैत्रिणीने तिचे नाव एका रिॲलिटी शोमध्ये नोंदवलं होत. तिथे गेल्यावर तिने तिचा परफॉर्मन्स दाखविला. ‘सिने स्टार की खोज’ हा तो रिॲलिटी शो होता. त्यानंतर तिला भरपूर हिंदी मालिकेच्या ऑफर आल्या. एका मराठी चित्रपटाची ऑफर आली. त्याच शूटिंग तीन महिन्यांत होणार होतं. त्यामुळे तिने या चित्रपटाला होकार दिला होता. चित्रपटाचं नाव होत ‘चि.सौ.कां. मेरी फर्नांडिस’; परंतु चित्रपटाचं शूटिंग लांबलं. इतर जाहिरातींचे काम तिने केले. त्याच कालावधीत तिच्या वडिलांचं निधन झालं. शेवटी तिने अमेरिकेला न जाता भारतातच राहण्याचा मोठा निर्णय घेतला. अभिनयात करिअर करण्याचा निर्णय तिने घेतला.
‘मुंबईचा डबेवाला’ हा तिचा पहिला चित्रपट रिलीज झाला. त्यानंतर ‘वासुदेव बळवंत फडके’ हा तिचा चित्रपट रिलीज झाला. तिने एक मराठी म्युझिक अल्बम केला ‘पप्पी दे पारूला.’ हा म्युझिक अल्बम खूप गाजला. काही जणांकडून तिला वाईट प्रतिक्रिया आल्या, तर काही जणांकडून तिला चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. अजूनही तिला त्या गाण्यासाठी ओळखलं जातं. हा तिच्या जीवनातला महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला.
नंतर तिने ‘बिग बॉस’मध्ये एंट्री घेतली. बिग बॉसचा अनुभव विचारल्यावर ती म्हणाली की, “बिग बॉसमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपल्या चांगल्या-वाईट गुणांची पारख होते. बिग बॉसमध्ये गेल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार येतात. तिथे शंभर दिवस राहणे खरोखरंच कठीण आहे. माणूस म्हणून तुम्ही स्ट्राँग होता. तेथील अनुभव सांगण्यापेक्षा तो अनुभव घेणं जास्त योग्य ठरेल.” बिग बॉस हा स्मिताच्या जीवनातील अजून एक टर्निंग पॉइंट ठरला. बिग बॉसनंतर तिला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. फिल्म इंडस्ट्रीतील सीनिअर लोकांकडून देखील प्रेम मिळालं.
‘बलुच’ हा एक चित्रपट आला होता. त्यामध्ये अभिनेते प्रवीण तरडे सूर्याच्या भूमिकेत होते. त्यांची पत्नी रत्नाच्या भूमिकेत ती होती. पानिपतच्या लढाईनंतरच्या घटनांवर आधारित हा चित्रपट होता.ज्यामध्ये दुर्याणी साम्राज्याच्या आक्रमक सैन्याच्या हातून मराठ्यांचा विनाशकारी पराभव झाला. हा चित्रपट त्या काळात मराठ्यांनी केलेल्या संघर्षावर आणि आव्हानांवर प्रकाश टाकणारा होता. यामधील भूमिकेसाठी तिने भरपूर तयारी केली. मर्दानी खेळाचे ट्रेनिंग घेतले होते. वजन कमी केले होते. त्या भूमिकेच्या दिसण्यावर मेहनत घेतली होती. प्रेक्षकांनी तिला या भूमिकेत चांगलेच लक्षात ठेवले होते. हा चित्रपट देखील एक टर्निंग पॉइंट आहे, असे ती मानते.
‘दिल दोस्ती दुनियादारी’ या नवीन चित्रपटात ती दिसणार आहे. हा तरुणाईचा चित्रपट आहे. यात आठ वेगवेगळ्या स्वभावाच्या मित्रांची कथा पाहायला मिळणार आहे. यामध्ये रिया नावाची व्यक्तिरेखा तिने साकारलेली आहे. ती बिंदास आहे. स्टेट फॉरवर्ड आहे. गोव्यामधील सुंदर लोकेशनवर या चित्रपटाचे शूटिंग झालेले आहे. यामध्ये चार गाणी आहेत. कॉलेज लाइफमध्ये धमाल, मस्ती करणारी दोस्त मंडळी, एकमेकांशी असलेले नाते आयुष्यभर जपतात. त्यांच्या याच मैत्रीच्या नात्याचा वेध आणि प्रेमाच्या नात्यातील गुंतागुंत दाखवतानाच, घडणाऱ्या काही घटनांमुळे बदलत जाणाऱ्या नात्याचा रंग असा रंजक प्रवास या चित्रपटात उलगडतो. स्मिताची दिल, दोस्ती, दुनियादारी प्रेक्षकांना भावेल का? हे लवकरच कळेल.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…