मुंबई: करीना कपूर(kareena kapoor) बॉलिवूडमध्ये अव्वल अभिनेत्रींपैकी एक आहे. वयाच्या ४३व्या वर्षीही ती लहानमोठ्या नव्हे तर मुख्य भूमिकेत दिसत आहे. नुकतेच तिने ओटीटीवर आपले पदार्पण केले. जानेजांमध्ये ती दिसली यात तिला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली.
करीना आपल्या प्रोफेशनल लाईफपेक्षा नेहमी पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असते. तिने आपल्या आयुष्यात अनेक बोल्ड निर्णय घेतले आहेत. यातीलच एक म्हणजे सैफ अली खानशी घेतलेला लग्नाचा निर्णय.
सैफ आणि तिच्या वयात तब्बल १० वर्षांचे अंतर आहे. सैफ ५३ वर्षांचा आहे तर ती सैफपेक्षा १० वर्षांनी वहान आहे. सैफसोबत वयाचेच अंतर नाही तिने जेव्हा त्याच्याशी लग्न केले तेव्हा सैफ घटस्फोटित तसेच दोन मुलांचा बाप होता. २०१२मध्ये करीनाने सैफशी लग्नगाठ बांधली होती.
जेव्हा करीनाने सैफशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्या कुटुंबियांना याचा काही प्रॉब्लेम नव्हता. मात्र करीनाच्या काही शुभचिंतकांनी तिला इशारा दिला होता. करीनाच्या जवळच्या लोकांचे म्हणणे होते की घटस्फोटित आणि दोन मुलांचा बाप असलेल्या सैफशी लग्न केल्यानंतर करीनाचे करिअर संपून जाईल. करीना त्यांच्या या बोलण्याने हैराण झाली होती आणि यावर तिने प्रतिक्रिया देताना म्हटले होते की जे होईल ते बघेन.
करीनाने त्यावेळेस कोणाचेच ऐकले नाही आणि सैफशी लग्न केले. आता दोघांच्या लग्नाला ११ वर्षे झाली आहे आणि दोघांना दोन मुलेही आहेत. सैफचे पहिले लग्न अमृता सिंह हिच्याशी झाले होते. या दोघांना दोन मुलेही आहेत. १३ वर्षानंतर हे लग्न मोडले आणि मुलांची कस्टडी अमृताला मिळाली होती. घटस्फोटानंतर सैफने करीनाशी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला तर अमृताने सिंगल मदर बनत मुलांचे संगोपन केले मात्र दुसरे लग्न केले नाही.
श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…