वाचा अर्चना पूरन सिंह आणि आशिष पाटील विषयी…

Share
  • ऐकलंत का! : दीपक परब

केवळ हसण्याचे लाखो रुपये…!

काहींचे नशीबच भारी असते म्हणतात. ते कसे? तर टेलिव्हिजनवर लाफ्टर क्विन ओळखली जाणारी अर्चना पूरन सिंह ही केवळ हसण्यावाटे लाखोंची कमाई करीत आहे. ‘कपिल शर्मा शो’मध्ये केवळ हसताना दिसणारी अभिनेत्री अर्चना पूरन सिंह तिच्या दिलखुलास तर कधी सात मजली हसण्यामुळे नेहमीच चर्चेत असते. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये कपिल अनेकदा अर्चना पूरन सिंहच्या हसण्यावरुन मस्ती करताना दिसतो. पण या शोमध्ये बसून केवळ हसण्यासाठी अर्चना सिंह मोठी रक्कम घेते. अर्चना पूरण सिंह ‘द कपिल शर्मा शो’मध्ये केवळ स्पेशल गेस्ट म्हणून असते. या शोमध्ये ती काहीच प्रतिक्रिया देत नाही, तिला कोणतेही डायलॉग्सही नसतात किंवा कोणताही अॅक्ट तिला करायचा नसतो. असे असतानाही अर्चना शोमधील एका एपिसोडसाठी लाखो रुपये मानधन घेते. अर्चना ‘कपिल शर्मा शो’मध्ये बसून केवळ हसण्याचे १० लाख रुपये घेते, अशी माहिती आहे. अर्चना एक सशक्त अभिनेत्री असून तिने अनेक चांगल्या सिनेमांमध्येही काम केले आहे. ‘कुछ कुछ होता है’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘मोहबब्तें’, ‘अग्नीपथ’ अशा सिनेमात तिने साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

लावणी किंग आशिष पाटलांची ‘सुंदरी’

लावणी किंग म्हणून मराठी कलाविश्वात प्रसिद्ध असणाऱ्या आशीष पाटील यांच्या ‘सुंदरी’ या म्युझिक व्हीडिओचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्यांचा हा पहिलाच म्युझिक व्हीडिओ असून गाण्याचे दिग्दर्शन, नृत्यदिग्दर्शन, सादरीकरण आशीष पाटील यांचेच आहे. आशीष पाटील, गिरिजा गुप्ते निर्मित या गाण्याला अवधूत गुप्ते यांचा आवाज लाभला आहे. तर प्रवीण कुवर यांनी गाण्याला संगीतबद्ध केले असून मंदार चोळकर हे गीतकार आहेत. एकवीरा म्युझिक प्रस्तुत, ‘सुंदरी’ या गाण्याचे छायाचित्रण हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे. ‘सुंदरी’च्या निमित्ताने प्रेक्षकांना लवकरच एक नृत्याविष्कार अनुभवायला मिळणार आहे.

‘बाप्पाचा आशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी आहे. त्यांच्या आशीर्वादाने मी ‘सुंदरी’ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलो आहे. प्रेक्षकांना गाणे नक्कीच आवडेल. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच इथपर्यंतचा प्रवास साध्य करू शकलो आणि इथून पुढेही माझ्या प्रयत्नांना नेहमीच प्रेक्षकांची साथ महत्त्वाची असेल’, अशा भावना आशिष पाटील यांनी व्यक्त केल्या, तर आशीष बरोबर काम काम करण्याचा अनुभव भारीच होता. आशीषच्या नृत्याबद्दल मी सांगण्याची गरजच नाही. त्याच्या लावणीतील नजाकती खूपच आकर्षक आहेत. ‘सुंदरी’च्या रूपाचे शृंगारिक वर्णन या गाण्यात केले आहे. २ ऑक्टोबरला ‘सुंदरी’ अवतरणार आहे, अशी माहिती अवधूत गुप्ते यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Recent Posts

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

16 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

19 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

39 minutes ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

59 minutes ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

1 hour ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

1 hour ago