Mumbai Trans Harbour Link : ९६.६० टक्के प्रगतीसह मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प प्रगतीपथावर!

Share
सुरक्षित प्रवास निश्चित करण्याच्या दृष्टीने पूर्णत्वाकडे असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से. यांनी केली पाहणी

एमटीएचएलवर अत्याधुनिक विद्युत दिव्यांच्या खांबांची उभारणी सुरू

मुंबई : दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई शहरांना जोडून मुंबई महानगर प्रदेशाच्या भविष्यातील प्रगतीचा द्योतक ठरणा-या सुमारे २२ किमी लांबीच्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Mumbai Trans Harbour Link) प्रकल्पाच्या प्रगतीची पाहणी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भा. प्र. से. यांनी केली.

डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से. यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा बारकाईने आढावा घेतला आणि प्रकल्पातील उर्वरित कामे गुणवत्तेसह झपाट्याने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

सद्यस्थितीत प्रकल्पाचे ९६.६० टक्के कामे पूर्ण झाली असून विद्युत खांबाच्या उभारणीचे काम सुरु आहे. या प्रकल्पात एकूण १२१२ विद्युत दिव्यांच्या खांबांची उभारणी केली जाणार असून त्यातील २० टक्के खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. या खांबांवरील विद्युत दिवे हे केंद्रीय नियंत्रण आणि देखरेख प्रणालीव्दारे (Central Control & Monitoring System ) नियंत्रित केले जातील. हे खांब सागरी क्षेत्रातील हवामानाच्यादृष्टीने निर्माण होणा-या आव्हानावर मात करतील अशा पद्धतीने निर्माण कऱण्यात आले आहे. विशेषतः खारट वातावरणात त्यांची उपयुक्तता, गंज-मुक्त पॉलीयुरेथेन लेप, गंज टाळण्यासाठी आणि आयुष्य वाढवण्यासाठी गॅल्वनायझेशन, जोरदार वा-याच्या वेगाशी सामना करण्यासारख्या आव्हानांना तोंड देणारी संरचनात्मक रचना आणि संपूर्ण पुलावर एकसमान प्रदीपन यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, या खांबांना वीज अवरोधक यंत्रणा बसवण्याची सोय करण्यात आली आहे.

बांधकामासाठी नाविन्यपूर्ण दृष्टीकोन

एमटीएचएल प्रकल्पाची व्याप्ती पाहता, हा प्रकल्प एकूण ४ पॅकेज मध्ये विभागला गेला आहे. ज्यामध्ये ३ पॅकेज हे स्थापत्य कामांकरीता असून चौथा पॅकेज हा इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट सिस्टम (intelligent transport system), स्वयंचलित टोल कलेक्शन यंत्रणा आणि विद्युत कामांकरीता असल्याने तो इतर पॅकज प्रमाणेच विशेष महत्त्वाचा आहे. एमटीएचल हा प्रकल्प सुमारे ६५ ते १८० मीटर लांबीच्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक (OSD) सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या प्रकल्पाचे बांधकाम करण्यात आले आहे.

मुंबई शहर आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या भागांसोबत जलद जोडणी

एमटीएचएल प्रकल्प हा नवी मुंबई सह प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदर, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गासह विविध महत्त्वाच्या ठिकाणी जलद जोडणी प्रदान करण्याची क्षमता राखणारा आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशाच्या सर्वांगीन विकासासाठी आणि समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे.

प्रकल्पातील उल्लेखनीय प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करताना एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से. म्हणाले, “मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प हा मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासातील एक महत्त्वाचा भाग आहे. हा केवळ कनेक्टिव्हिटी सुधारणारा प्रकल्प नसून प्रदेशाच्या सर्वांगीण समृद्धीसाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सुरू असलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा मला आनंद होत आहे आणि हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यात सहभागी सर्वांचे योगदान हे महत्त्वपूर्ण असून ते योग्यरीतीने सुरू आहे.”

एमएमआरडीए एमटीएचएल प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी आणि मुंबई आणि नवी मुंबईच्या वाहतूक नेटवर्कमध्ये त्याचे यशस्वी एकत्रीकरण सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.

Recent Posts

IND vs PAK Tension: प्रत्येक हल्ल्याला चोख उत्तर देऊ, जयशंकर यांनी EUला दिली पाकिस्तान हल्ल्याची माहिती

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…

35 minutes ago

Live: भारताने लाहोर-सियालकोटमध्ये केला हल्ला, पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्धवस्त

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…

51 minutes ago

PBKS vs DC, IPL 2025: मोठी बातमी! पाकिस्तान हल्ल्यादरम्यान रद्द झाला पंजाब-दिल्लीचा IPL सामना

धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…

2 hours ago

Jammu Drone Attack : पाकड्यांची मस्ती काय थांबेना! जम्मूत ड्रोन हल्ला, पठाणकोठमध्ये स्फोट, जम्मूमध्ये ब्लॅकआऊट

जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…

3 hours ago

थेट प्रहार! पाकिस्तानमधील गाणी, सिरीज, चित्रपट भारतात थांबवा!

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील…

3 hours ago