Nitesh Rane : चांगल्या कामाला पनवती लावण्याचे काम उबाठाचे नेते आणि संजय राऊत करतात

Share

भाजप आमदार नितेश राणे यांची खोचक टीका

मराठवाड्याप्रमाणे लवकरच आमच्या कोकणातही एक बैठक व्हावी : नितेश राणे

कणकवली : महाराष्ट्र सरकारची कॅबिनेट बैठक आज मराठवाड्यात (Marathwada) होत आहे. राज्य सरकारकडून मराठवाड्याला भरभरुन देण्याचं काम होणार आहे. पण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीने विकासाची घोडदौड सुरु आहे त्यावर पनवती लावण्याचं काम उबाठाचे नेते (Thackeray Group) सातत्याने करत आहेत. चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म आहे, पण काही राज्यांमध्ये चांगलं झालं की लगेच काळ्या मांजरीसारखं आडवं येणं हे उबाठाचे नेते आणि संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) करत आहेत, अशी जोरदार टीका भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली. सरकारच्या चांगल्या कामांवरही सातत्याने टीका करणाऱ्या उबाठा नेत्यांचे त्यांनी वाभाडे काढले.

नितेश राणे म्हणाले, मराठवाड्यातील सर्व हॉटेल्स बुक होणं, एवढा खर्च होणं याविषयी हे बोलतात. हॉटेल व्यावसायिकांचं अगर भलं होत असेल तर ते या लोकांना बघवत नाही. पण स्वतःचा मालक मुंबईमध्ये स्पोर्टस आणि रिक्रिएशनच्या जागेवर अनधिकृत पद्धतीने हॉटेल बांधतोय, हे या लोकांना चालतं. संजय राऊतच्या मालकाचा मुलगा महाविकास आघाडीचे सरकार असताना जेव्हा दाओसच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा वरुण सरदेसाई आणि इतर लोकांना कोणाच्या पैशांनी घेऊन गेला होता? आणि दाओसचा दौरा काही दिवसांसाठी होता मात्र त्यानंतर सरकारमधील काही शासकीय अधिकाऱ्यांना घेऊन लंडनमध्ये नेमकं कोण मौजमजा करत होता? त्याचा खर्च कोणी दिला? असे खडे सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केले.

पुढे ते म्हणाले, ताडोबाला संजय राऊतच्या मालकाचा मुलगा नेहमी एका प्रशासकीय अधिकाऱ्याला घेऊन जायचा. त्याचा खर्च कोण उचलत होतं? म्हणजे स्वतःचं सरकार असताना सरकारच्या पैशांचा वापर आपली घरं चालवण्यासाठी करायचा, पैशांची उधळपट्टी करायची, बाहेरगावच्या वाऱ्या करायच्या आणि मग आमचं सरकार जेव्हा मराठवाड्यासाठी, राज्यासाठी काहीतरी चांगलं करत असेल तेव्हा लगेच काळ्या मांजरीसारखं आडवं यायचं, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

आमच्याकडे पण ‘प्रहार’ वृत्तपत्र आहे…

काल संजय राजाराम राऊत म्हणाला की मी मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत जाऊन बसणार आणि पत्रकार म्हणून प्रश्न विचारणार. आमच्याकडे पण ‘प्रहार’ वृत्तपत्र आहे, आम्ही पण आमच्या संपादकांना घेऊन उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत जाणार आणि त्यांना प्रश्न विचारणार की, तुम्ही महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रात भ्रष्टाचार का केला? आता आदित्य ठाकरेला शेतकरी आठवतात, म्हणजे सत्ता असताना दिनू मौर्यच्या खांद्यावर अणि सत्ता नसताना शेतकऱ्यांच्या बांधावर अशी या आदित्य ठाकरेची गत झालेली आहे, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली.

लवकरच आमच्या कोकणातही एक बैठक व्हावी

आज मराठवाड्यात जशी बैठक होत आहे, तसं मंत्रिमंडळात कोकणातीलही काही मंत्री आहेत. तर माझी अशी अपेक्षा आहे की लवकरच एक बैठक आमच्या कोकणातही व्हावी आणि याबाबत मी सरकारला पत्र लिहिणार आहे, असं नितेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

2 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

2 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

3 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

3 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

3 hours ago