मुंबई:गणेशोत्सव(ganeshostav) म्हटला की कोकणी माणसाला ओढ लागते ती कोकणची. कधी एकदा कोकणात जातो असे होते. यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे रेल्वे असो, बस किंवा खाजगी वाहन सगळेच हाऊसफुल्ल झाले आहेत. दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी धाव घेतली आहे.
भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून गेल्या अकरा वर्षा पासून कोकणात जाणाऱ्या भक्तांकरिता मोफत प्रवासाचा उपक्रम राबवला जात आहे. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खास मोदी एक्सप्रेस सोडली जाते. आमदार नितेश राणे स्वखर्चाने हा उपक्रम राबवतात.
यंदा १७ सप्टेंबरला ही मोदी एक्सप्रेस सोडण्यात येणार आहे. या मोदी एक्सप्रेसच्या गाडीच्या तिकीटाचे वाटप आज करण्यात आले. यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही आनंदाची बाबच म्हणावी लागेल. यावेळी तिकीट मिळाल्याबद्दल कोकणवासीय गणेशभक्तांनी नितेश राणे यांचे विशेष आभार मानले.
श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…