नाशिक : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddahv Thackeray) यांनी आज जळगावात छत्रपती शिवाजी महाराज व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. सभा संपल्यावर भाषणबाजी करत सत्ताधार्यांवर टीका केली. पण याचा आनंद काही फार काळ टिकला नाही. ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी उद्धव ठाकरेंना व्हॉट्सअॅपद्वारे राजीनामा पाठवला आहे.
शिर्डीत नव्या संपर्कप्रमुखांची निवड केल्याने तसेच भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांना लोकसभेचं तिकीट जवळपास निश्चित मानले जात असल्याने बबनराव घोलप नाराज असल्याची चर्चा होती. उद्धव ठाकरे यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीवर परस्पर शिक्कामोर्तब केल्याने बबनराव घोलप अस्वस्थ होते. त्यांनी मातोश्रीवर धाव घेऊन उद्धव ठाकरेंकडे नाराजी व्यक्त करुनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. या नाराजीतूनच त्यांनी राजीनामा दिला असावा असं म्हटलं जात आहे. ठाकरे गटामध्ये काही आलबेल नसल्याचंच यानिमित्ताने समोर आलं आहे.
दरम्यान, बबनराव घोलप सध्या आऊट ऑफ कव्हरेज आहेत. उद्धव ठाकरेंचे विश्वासू अशी बबनराव घोलप यांची ओळख आहे. माजी मंत्री असलेले बबन घोलप हे देवळाली मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे त्यांचा राजीनामा हा ठाकरे गटासाठी धक्का समजला जात आहे.
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…