मुंबई : भारत (Bharat) हे आपल्या देशाचे मूळ नाव आहे, तर ‘इंडिया’ (India) हे आपल्याला इंग्रजांनी दिलेले नाव आहे, अशी भूमिका भाजपने (BJP) घेतली आहे. या भूमिकेला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. भाजपने हा मुद्दा वर उचलून धरल्यामुळे ‘भारत’ या नावासाठी आग्रही असलेले भारतीय आता व्यक्त होऊ लागले आहेत. बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीदेखील या संदर्भात ‘भारत माता की जय’ असं ट्वीट करत नावाला पाठिंबा दर्शवला होता. यानंतर आता क्रिकेट जगतातील दिग्गज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनीही या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले आहे.
सुनील गावस्कर म्हणाले, “भारत हेच आपल्या देशाचे मूळ नाव आहे. त्याला एक सुंदर नाद आहे. पण या गोष्टी अधिकृत स्तरावर मान्य करणं गरजेचं आहे. सरकारी स्तरावर किंवा ‘बीसीसीआय’च्या स्तरावर जर हा मुद्दा मान्य झाला तर आपल्या संघाचे नाव ‘भारत क्रिकेट टीम’ करता येऊ शकेल. याआधीही बऱ्याच ठिकाणी असे बदल झाले आहेत. बर्मा नाव बदलून आता त्याचे म्यानमार करण्यात आले. त्यामुळे मूळ नावाने जर देश ओळखला जाणार असेल तर मला तरी त्यात काहीच वावगं वाटत नाही. पण मुद्दा एवढाच की जे बदल होतील ते सर्व स्तरावर सरसकट व्हायला हवेत,” असे स्पष्ट मत सुनील गावसकर यांनी व्यक्त केले.
याचबरोबर क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) देखील बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना पत्र लिहिले होते. त्यात त्याने म्हटले होते की, “मला नेहमी असे वाटायचे की भारत या नावानेच आपला देश ओळखला जावा. आपण सारे भारतीय आहोत. इंडिया हे नाव ब्रिटीशांनी दिले होते. आता ते नाव बदलायला हवे. त्यांनी केलेला बदल हा त्यांच्या सोयीसाठी होता. आता आपण पुन्हा मूळ नाव भारत ठेवायला हवे. त्यामुळेच माझी अशी इच्छा आहे की भारतीय संघाच्या खेळाडूंच्या जर्सीवर छातीवरील इंडिया या नावाऐवजी भारत हे नाव लिहिले जावे.”
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…