मराठा समाजाला आरक्षण मिळावे हा आमचा प्रामाणिक हेतू आहे मात्र त्यासाठी आमच्या कोट्यातून का ? असा सवाल करत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (Reservation) देण्यास ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष प्रकाशआण्णा शेंडगे (Prakash Shendage) यांनी विरोध दर्शवला. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ओबीसीमधून (OBC Reservation) मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिल्यास त्या जातींवर अन्याय होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मराठा समाजाला खुल्या गटातून EWS चे आरक्षण मिळत आहे ते वाढवावे किंवा आवश्यक वाटल्यास घटना दुरुस्ती करून त्यांना ओबीसी प्रवर्ग वगळून स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण द्यावे. अशी मागणीही शेंडगे यांनी यावेळी केली. ओबीसी व मराठा यांची निश्चित लोकसंख्या सांगता येणार नाही. ओबीसी जनगणना झाली पाहिजे. मराठा समाजाचीही जनगणना झाली पाहिजे. सर्व डाटा एकत्र गोळा करून झाल्यावर लोकसंख्येच्या प्रमाणावर सामाजिक , शिक्षण , आर्थिक असा डाटा मिळाला की , लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा लाभ देता येईल, असे शेंडगे यांनी यावेळी स्पष्ट केले.
मराठा व कुणबी एकच आहेत, यावर जोपर्यंत अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न असंविधानिक पातळीवर घेऊ नये, अशीही त्यांनी मागणी केली. मराठा जातीचे ओबीसीकरण करू नये. मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये. बिहार राज्याच्या धर्तीवर जतनिहाय जनगणना करून ओबीसी समाजाला न्याय द्यावा. नाहीतर मतदानाच्या मतपेटीतून या समाजाचा आक्रोश पाहावयास मिळेल व रस्त्यावरची लढाईही पाहवयास मिळेल, असा इशाराही ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष प्रकाशआण्णा शेंडगे यांनी यावेळी दिला.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील…