मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) अनुषंगाने उपसमितीची एक बैठक आज संपन्न झाली. या बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळेस मराठा समाजाला कुणबी दाखला देण्याच्या संदर्भात समिती नेमली असून महिन्याभरात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अशी महिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज उच्चस्तरीय बैठक पार पडली. मी स्वत: उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी बोललो. त्यांच्या आंदोलनावर सरकार काम करत आहे. आधीचे सरकार सुप्रीम कोर्टासमोर काही बाजू मांडू शकले नाही. मराठा समाज मागास नाही, हे सर्वोच्च न्यायायलयाने म्हटलं आहे. मराठा समाज मागास आहे, या बाबी कोर्टासमोर आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
पुढे ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे व ते टिकले पाहिजे ही आमची भूमिका आहे. आम्ही टास्क फोर्सची स्थापना केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे. मराठा समाज मागासलेला आहे आणि ते सिद्ध व्हायला हवे. सरकार पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना जे फायदे मिळतात ते देत आहोत. आंदोलनांच्या आडून शांतता बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
याआधी अधिसंख्यापदावर ३७०० तरुणांना आम्ही नोकरीत सामावून घेतलं. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेकांना कर्ज दिलं. त्याचं व्याज सरकार भरत आहे. मराठा समाजाने थोडा संयम राखण्याची गरज असल्याच शिंदे यांनी म्हटलं.
दरम्यान मराठा समाजाच्या आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. त्यांच्यापासून मराठा समाजाने सावध राहिलं पाहिजे. आम्हाला या मुद्द्याचं राजकारण करायचं नाही. तसेच लाठीचार्जची चौकशी करण्यात येणार असल्याचं शिंदे यांनी म्हटलं. या व्यतिरिक्त मराठवाड्यातील मराठा समाजाच्या कुणबी नोंदीबाबत तपासणी करण्यासाठी वेळ लागेल. ते काम सुरू असल्याचंही शिंदे यांनी नमूद केलं.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…