नवी दिल्ली : भारताने आपली महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहिम (Chandrayaan Mission) अत्यंत यशस्वीरित्या पार पाडली. हा भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरुन ठेवावा असाच क्षण आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीदेखील इस्रोच्या (ISRO) मुख्यालयात जाऊन शास्त्रज्ञांच्या चमूचे अभिनंदन केले. यानंतर काहीच दिवसांत भारताने आपली पहिलीवहिली सौरमोहिम हाती घेतली. आज या मोहिमेतील आदित्य एल-१ चे (Aditya L-1) यशस्वी उड्डाण झाले असून त्यानिमित्त भारतावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हे वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांचं यश’ असं ट्विट करत पुन्हा एकदा भारतीय शास्त्रज्ञांची पाठ थोपटली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, चांद्रयान-३ च्या यशानंतर भारताचा अवकाश प्रवास सुरूच आहे, भारताच्या आदित्य एल-१ या पहिल्या सौर मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी इस्रोच्या आमच्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी विश्वाची चांगली समज विकसित करण्यासाठी आमचे अथक वैज्ञानिक प्रयत्न सुरूच राहतील, असं मोदीजी म्हणाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आपल्या एक्स अकाऊंटद्वारे आदित्य एल-१ च्या प्रक्षेपणाचा व्हिडीओ शेअर करत भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, आपल्या शास्त्रज्ञांनी वेळोवेळी आपले सामर्थ्य आणि तेज सिद्ध केले आहे. भारताचे पहिले सौर मिशन आदित्य एल-१चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल देशाला अभिमान आणि आनंद आहे. या अतुलनीय कामगिरीसाठी इस्रो संघाचे अभिनंदन. अमृत महोत्सवादरम्यान अंतराळ क्षेत्रातील आत्मनिर्भर भारताची पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने ही एक मोठी वाटचाल आहे, असं अमित शाह म्हणाले.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…