कणकवली : काल महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदूला अस्वस्थ करणारी घटना मातोश्री कलानगर मध्ये घडली. ज्या पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये रामनवमीला बंदी आहे, हिंदूंवर अत्याचार होतात त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) मातोश्रीवर जातात आणि उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) राखी बांधतात. ज्या मातोश्री मध्ये बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) हिंदूंचा आवाज बुलंद केला, १९९३ च्या दंगलीत हिंदूंना वाचवलं त्याच मातोश्रीत हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या ममता बॅनर्जी कडून उद्धवजी राखी बांधून घेतात. उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाची व्याख्या काय आता त्यांनी समजून सांगावं, असं आव्हान भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिलं आहे. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावर सवाल उठवला आहे.
नितेश राणे म्हणाले, कालचे चित्र बघून मुंबईतील बांगलादेशी आणि रोहिग्यांनी दिवाळी साजरी केली असेल. परत चुकून मुंबईत सत्ता उद्धव ठाकरेंकडे आली तर मुंबईत हिंदू कमी होऊन बांगलादेशी आणि रोहिंगेचे शहर होईल, हे चित्र काल रक्षाबंधनच्या निमित्ताने दाखवण्यात आलं. काँग्रेसच्या नेत्यांपेक्षा संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि पेंग्विनच राहुल गांधींचं जास्त कौतुक करतायत, सोनिया गांधींचं गुणगान गातायत. पण जर खरंच तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असाल तर राहुल गांधी, सोनिया गांधी यांना शिवाजीपार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करायला लावा, असं नितेश राणे यांनी उबाठा गटातील नेत्यांना आवाहन केलं आहे.
वीर सावरकरांचा नेहमी अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं. एका बाजूला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना भेटायचं, दुसर्या बाजूला सावरकरांचा द्वेष करणार्या राहुल गांधींसोबत बसायचं आणि स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायचं, अशा उद्धव ठाकरेंचा खरा चेहरा समोर आला पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले.
भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांच्यावर लोकांचं वाढलेलं प्रेम दिसून येत आहे या संजय राऊतांच्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, राहुल गांधीबरोबर व्हॅलेंटाईन डे संजय राऊतच साजरा करेल, बाकी कोणीच त्यांच्यावर प्रेम करताना दिसलं नाही म्हणून तर काँग्रेसची एवढी पिछेहाट झाली.
आम्ही वाट बघतोय की इंडिया आघाडीचे लोक हुकूमाचा एक्का कधी बाहेर काढतायत. त्यानंतर नितीशकुमार काय भूमिका घेतील , अरविंद केजरीवाल कुठले पत्ते टाकतील आणि मग काँग्रेसची काय अवस्था होईल, हे जाणण्यासाठी आमची खरंच इच्छा आणि उत्सुकता आहे की त्यांनी हुकूमाचा एक्का बाहेर काढावा, असं नितेश राणे म्हणाले.
बच्चू कडूंच्या आंदोलनावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली की, सचिन तेंडुलकरसारख्या एका महान खेळाडूला अशा प्रकारच्या विषयांमध्ये ओढू नये. सचिन तेंडुलकरने आपल्या देशाला सन्मान मिळवून दिला आहे. त्यामुळे मी बच्चू कडूजींना सांगेन की सचिन तेंडुलकरविषयी काही आक्षेप असेल तर त्यांनी त्यांच्याशी बोलावं, पण असा खेळाडू परत होणं नाही आणि तो महाराष्ट्राच्या मातीतून तयार झाला आहे. म्हणून आंदोलन कुठे करावं आणि कोणासमोर करावं याचं थोडं भान बच्चू कडूजींनी ठेवावं, असा माझा मैत्रीचा सल्ला आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…