- ऐकलंत का! : दीपक परब
‘नाट्यधारा’: ‘द रॉयल ऑपेरा हाऊस’मध्ये प्रादेशिक थिएटरचे पुनरुत्थान
रंगमंच हा नेहमीच मुंबईच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग राहिला आहे. बॉम्बे ते मुंबई या प्रवासात या शहराने मुंबईच्या दक्षिणेकडील उपनगरीय भागांमध्ये नाट्य उद्योगाची उत्क्रांती, वाढ आणि स्थिर स्थलांतर पाहिले आहे. एक अल्पशा विरामानंतर, मुंबईचा दक्षिणेकडील प्रदेश पुन्हा एकदा नाटकाच्या तेजस्वी इतिहासाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि नाट्यप्रदर्शनांना पुन्हा जिवंत करण्यासाठी सज्ज झाला आहे. रॉयल ऑपेरा हाऊस, मुंबईच्या पहिल्या-वहिल्या मराठी नाट्यमहोत्सव ‘नाट्य वेल्हाळ’च्या भव्य यशानंतर, बहुभाषिक प्रादेशिक रंगभूमीची एक अनोखी मांडणी असलेल्या ‘नाट्य धारा- प्रादेशिक परफॉर्मेटिव्ह आर्टचे सादरीकरण’ घेऊन आम्ही पुन्हा सज्ज आहोत. अॅविड लर्निंग, क्युरेटेड क्लासिक्स, अस्तित्व आणि मुंबई थिएटर गाईड यांच्या सहकार्याने दर महिन्यातून एकदा विविध शैलीतील नाटकांचे सादरीकरण केले जाणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये, मुंबईने उपनगरीय क्षेत्राकडे नाट्यसंवर्धनाचा एक मोठा बदल पाहिला आहे, नाट्यधारा हा थिएटरचा मोहक कालखंड गिरगावात ऑपेरा हाऊसच्या मंचावर परत आणण्याचा एक उपक्रम आहे. नाट्यधारा मुंबईच्या पारंपरिक, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि आधुनिक गतिमान नाट्य पद्धतींचा दीर्घकालीन उत्सवाची कल्पना करते.
रॉयल ऑपेरा हाऊस २०१६ मध्ये पुन्हा उघडल्यापासून शहराचे सर्वसमावेशक सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयास आले आणि ते न केवळ व्हिज्युअल आणि परफॉर्मिंग आर्ट्सचे पालनपोषण, समर्थन आणि प्रचार करत आहे, परंतु डिझाइन, साहित्य आणि इतर डोमेनमधील कार्यक्रमांची गतिशील श्रेणी देखील करत आहे. भव्य शाही झुंबर, ध्वनिशास्त्र, स्टेजक्राफ्ट आणि प्रकाशयोजना यासह तांत्रिक सुधारणांच्या विस्तृत श्रेणीसह प्रादेशिक थिएटरचे आयोजन करण्यास उत्सुक आहे.
अतुल सत्य कौशिक, लतिका जैन, हेमांगी कवी, गिरीश कुलकर्णी, जय कपाडिया, ओजस रावल, मेहुल बुच, अल्पना बुच यांसारख्या थिएटर वर्तुळातील काही प्रमुख कलाकारांनी अभिनय केलेल्या हिंदी, गुजराथी आणि मराठी भाषेतील सादरीकरणासह आम्ही ह्या नाट्यधाराचा शुभारंभ करणार आहोत.
पहिल्या दिवसाच्या शुभारंभात अतुल सत्य कौशिक लिखित, दिग्दर्शित रामायणातील ‘महाकाव्य’ कथा ‘प्रेम रामायण – अ म्युझिकल’ डान्स ड्रामासह सादर होईल. दुसऱ्या दिवशी हर्षदा संजय बोरकर लिखित/दिग्दर्शित मराठी नाटक ‘जन्मावरी’ – नृत्य, संगीत आणि तात्विक चित्रण यांचा एक अनोखा मिलाफ, त्यानंतर देशातील एकमेव यशस्वीपणे चालू असलेल्या ‘गुजराती दास्तांगोई’सह भेट आणि प्रयाग दवे लिखित / जय कपाडिया दिगदराशीत ‘इशारा इशारा मा’ या विनोदी नाटकांचे प्रस्तुतीकरण करण्यात येईल. शेवटच्या दिवशी सकाळी डॉ. हर्षवर्धन श्रोत्री लिखित / किरण यज्ञोपवीत दिग्दर्शित आणि गिरीश कुलकर्णी अभिनित महाराष्ट्र कल्चरल सेन्टर,पुणेचे मराठी नाटक ‘होल बॉडी मसाज’ (एक सायको थ्रिलर कथेवर आधारित) सादर केला जाईल. वर नमूद केलेली नाटके रवी मिश्रा आणि भाविक शाह ह्यांच्या सहकार्याने सादर केली जाणार आहेत. रॉयल ऑपेरा हाऊस, मुंबईच्या सर्वात प्रतिष्ठित थिएटर स्टेजवर, रिअल-टाइम मनमोहक नाट्य अनुभवांमध्ये पुन्हा एकदा स्वतःला गुंतवून ठेवण्यासाठी सज्ज व्हा.
‘तिरसाट’चा डिजिटल प्रीमियर ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीवर
‘तिरसाट’ हा प्रेमाचा नवा हळवा प्रवास आहे. ज्या प्रवासात प्रेक्षकरूपी प्रत्येक प्रवासी ‘४ सप्टेंबर’ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर भावनिक पदयात्रा करणार आहे. तिरसाटच्या निमित्ताने सुरू झालेला प्रेम मिळवण्यासाठीचा हा प्रवास दिग्दर्शक प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी या चित्रपटात मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला असून ‘नीरज सूर्यकांत’ आणि ‘तेजस्विनी शिर्के’ ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे. या चित्रपटामधील पी. शंकरन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आणि पार्श्वसंगीत या चित्रपटाचा जीव असून हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार आहे. दिनेश किरवे यांच्या ‘क्लास वन फिल्म्स’ने ‘तिरसाट’ या चित्रपटाची निर्मिती केली असून अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर पहिल्यांदाच वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.
बाळ्याचं खरं प्रेम समीने नाकारल्यानंतर, ‘समीशिवाय आपले जीवन नाही’ असे वाटल्याने बाळू आपले जीवन संपवण्याचे पाऊल उचलतो; परंतु बाळूचे वडील हे कृत्य थांबवण्यासाठी धावतात आणि त्याला जीवन आणि प्रेमाचे सार समजावून सांगतात. जीवनात एक यशस्वी व्यक्ती बनण्यासाठी आणि प्रेम मिळवण्यासाठी तो एक उद्योजक बनतो आणि स्वतःला सिद्ध करून आपल्या आयुष्याला एक नवे वळण देतो.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra