नवा उत्साह, नवे चैतन्य…

Share

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर

सध्या महाविद्यालयांमध्ये अगदी चैतन्यशील वातावरण आहे. हा महिना विविध मंडलांच्या उद्घाटनांचा! मुले नुसती झपाटल्यासारखी उत्साहात वावरत असतात. चैतन्याने सळसळत असतात. वाङ्मय मंडळे ही मराठी विभागाचा श्वास असतात. इंजिनीअरिंग, मेडिकल, कायदा, विज्ञान इत्यादी महाविद्यालयांमध्ये मराठी विषय नसतो. पण तिथे वाङ्मय मंडळे असतात. एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेण्याकरता धडपडणारी मुले असतात. यातली काही मुले उत्तम मराठी गाणी गातात. लोककलांमधले कौशल्य व नैपुण्य दाखवतात. मराठीतून उत्तम कविता लिहितात. याचा अर्थ नव्या पिढीचेही आपल्या भाषेवर प्रेम आहे. त्यांना संगीत, साहित्य, कला या सर्व माध्यमांतून अभिव्यक्ती करणे आवडते. नि तसे असेल, तर महाविद्यालयांच्या मराठी विभागांना वर्षभरात एक-दोन कार्यक्रम करून चालणार नाह, तर सातत्याने मुलांना आपल्या भाषेशी जोडणारे उपक्रम शोधायला हवे.

मी गेली तीसपेक्षा अधिक वर्षे सोमय्या कला वाणिज्य महाविद्यालयात अध्यापन करते. ‘मराठी प्रबोधन’ हे आमचे वाङ्मय मंडळ. मराठी विषय निवडून साहित्याचा अभ्यास करणारे व त्याकरता पदवी स्तरावर व पुढेही मराठीचा अभ्यास करणारे विद्यार्थी संख्येने कमी-कमी होत आहेत. हे चित्र मुंबईसारख्या शहरात सर्वदूर आहे. मात्र मराठी वाङ्मय मंडळांच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ऊर्जा मात्र आहे तशीच आहे.

साधारणपणे १९९५ पासून आमचा मराठी विभाग ‘आशय’ नावाचे हस्तलिखित प्रकाशित करतो. मुले अंकाकरिता विषय ठरवतात. ग्रंथालयात संदर्भ संशोधन करतात. सुंदर अक्षर असणारी मुले शोधून काढतात. याही वर्षी स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या परिपूर्तीची संकल्पना मुलांनी निवडली आहे.
कोरोना काळात मुलांनी यूट्यूब चॅनल सुरू केले. इन्स्टाग्राम, फेसबुक ही माध्यमे मुले मराठीच्या कार्यक्रमांकरिता वापरू लागली आहेत. वाङ्मय मंडळाचे शीर्षकगीत तयार करून ते सादर करायची जय्यत सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी मला दिनकर गांगल सरांचा फोन आला ते नवी कल्पना सांगण्याकरिता. उत्साहाने भारलेला आवाज नि नावीन्यपूर्णतेचा ध्यास. तरुणाईशी संवाद साधायची जी सहजता मी त्यांच्याशी बोलताना अनुभवते, ती पाहिली की वाटते, तरुणाईकरिता हे असे सोबत असणे हीदेखील त्यांची ताकद ठरेल.
मुलं करत राहतील नवीन नवीन.
आपण फक्त सोबत असायचे.
ती लढतील आपल्या भाषेकरिता.
ती जगवतील नि जपतील तिला प्राणपणाने!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Recent Posts

Gautami Patil Item Song: गौतमी पाटीलच्या आयटम नंबरने लावली आग… म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’

Gautami Patil Item Song: महाराष्ट्राची सुप्रसिद्ध नृत्यांगना, गौतमी पाटीलला कोण नाही ओळखत. 'सबसे कातील गौतमी…

29 minutes ago

Very Parivarik Trailer Launched: कौटुंबिक कॉमेडी शो ‘वेरी पारिवारिक’ सीझन २ चा ट्रेलर लॉन्च

Very Parivarik Trailer launched: बहुप्रतिक्षित कौटुंबिक कॉमेडी शो ‘वेरी पारिवारिक’च्या दुसऱ्या सिझनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित…

1 hour ago

पाकिस्तानच्या गोळीबारात आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यात १३ ठार आणि ५९ जखमी

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात 'ऑपरेशन सिंदूर' केल्यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारतात…

1 hour ago

उत्तरकाशीत हेलिकॉप्टर कोसळले, तीन मुंबईकरांचा मृत्यू

उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत वैमानिकासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला…

2 hours ago

पाकने केला 5 भारतीय विमाने पाडल्याचा दावा, पण पुरावा देताना बोबडीच वळली

जम्मू आणि काश्मीर: भारतीय लष्कराने पाकिस्तानात आणि पाकव्याप्त काश्मीरात 7 मे च्या पहाटे, नऊ कुख्यात…

3 hours ago

लाहोरमध्ये लागोपाठ तीन स्फोट, पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण

लाहोर : भारतीय सैन्याने बुधवार ७ मे रोजी पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर…

3 hours ago